आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर पियानो दिसला तर वाजवू लागला भिकारी, लोकांनी चौकशी केली तर समोर आले हे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडा - येथील रस्त्यांवर एका भिकाऱ्याला अत्यंत सुमधूर पियानो वाजवताना पाऊल लोक आवाक् झाले. या भिकाऱ्याची अवस्था वाईट होती. मोठे वाढलेले केस, बनियान आणि दाढी अशा अवस्थेत तो होता पण तो एवढा सुमधूर पियानो वाजवत होता की, लोक थांबून ऐकत होते. काही लोकांनी त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि त्यातूनच ज्याचे जीवन बदलले. 


6-7 वर्षांपासून बेघर 
लोकांनी त्याची चौकशी केला तेव्हा समजले की, तो भिकारी नाही. गरीबीमुळे तो बेघर झाला आणि 6-7 वर्षांपासून रस्त्यावर राहतोय. त्याने नाव डोनाल्ड गॉल्ड आणि वय 50 असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, रस्त्यावर एवढा सुंदर पियानो पाहून त्याला राहावले नाही. त्याने तरुणपणी पियानो वाजवायला शिकले होते असे सांगितले. 


पाहता-पाहता बनला स्टार 
फ्लोरिडा सरकारने संगीताचा प्रचार करण्यासाठी रस्यावर पियानो ठेवले होते. तोच पियानो डोनाल्ड वाजवत होता. अनेकांनी डोनाल्डचे व्हिडिओ अपलोड केले. ते व्हायरल झाले. एका व्हिडिओल तर 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. 


लोकांनी केली मदत 
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक डोनाल्डला भेटले. त्याचे रुपडे पालटले. अनेकांनी त्याला मदत केली. गरीबीमुळे त्याचे टॅलेंट वाया जाऊ द्यायचे नाही असे ठरवले. त्यानंतर त्याच्यासाठी एक ऑनलाइन फंडिंग पेज तयार केले. त्यातून त्याला 40 हजार डॉलर्सची मदत मिळाली. 


राष्ट्रीय स्तरावर केले सादरीकरण 
फ्लोरिडा सरकारला याबाबत समजले तेव्हा त्यांनी डोनाल्डला राष्ट्रीय संगीत कार्यक्रमात सादरीकरण करण्याची संधी दिली. डोनाल्डनेही असे सादरीकरण केले की लोक त्याचे फॅन बनले. डोनाल्ड आज एक प्रसिद्ध संगीतकार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...