आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेघरांचे समर्थन : 60 हजारांहून जास्त लोक झोपले खुल्या आकाशाखाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र लंडनच्या ट्राफल्गर स्क्वेअरचे आहे. येथे लोक वॉटरप्रूफ बेडिंग घेऊन पोहोचले होते. - Divya Marathi
छायाचित्र लंडनच्या ट्राफल्गर स्क्वेअरचे आहे. येथे लोक वॉटरप्रूफ बेडिंग घेऊन पोहोचले होते.
  • चॅरिटी इव्हेंटमध्ये जगभरातील 50 शहरांचा सहभाग, 350 कोटींच्या निधी संकलनाचा अंदाज
  • अमेरिका ते हाँगकाँगपर्यंत उत्साह; विद्यार्थी, तरुण सहभागी

​​​​​​न्यूयॉर्क / लंडन : न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर असो की लंडनचे ट्राफल्गर स्क्वेअर किंवा एडिनबर्गचे प्रिन्स गार्डन, शनिवारी रात्री या सर्व ठिकाणी एकसारखे चित्र पाहायला मिळाले. शेकडोंच्या संख्येने लोक अंथरूण-पांघरूण घेऊन झोपण्यासाठी आले हाेते. निमित्त होते जागतिक पातळीवरील बीग स्लीप आऊटचे. बेघरांच्या समर्थनासाठी आयाेजित या उपक्रमात ५० शहरांतील लोकांनी सहभाग घेतला होता. या आयोजनाच्या माध्यमातून सुमारे ३५० कोटी रुपयांचा निधी संकलित होण्याची शक्यता आहे. हा निधी बेघर, विस्थापित लोकांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये वाटप केला जाणार आहे. लंडनमध्ये अभियानाद्वारे संगीत क्षेत्रातील बड्या कलाकारांनी सादरीकरण केले. न्यूयॉर्कमध्ये चित्रपट अभिनेता विल स्मिथ यांनी या सामाजिक उपक्रमाला आपला पाठिंबा दिला.१० कोटींहून जास्त बेघर : संयुक्त राष्ट्राच्या मते ११० कोटींहून जास्त लोक हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठत आहेत. १० कोटी लोकांकडे घर नाही. हिंसाचारामुळे ७ कोटींहून जास्त लोक विस्थापित झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...