आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्कूटरची लॉन्चिंगपूर्वीच माहिती लीक, जाणून घ्या कोणते असतील नवीन फीचर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली । होंडा अॅक्टिव्हा 6G स्कूटर लवकरच लॉन्च होत आहे. पण लॉन्चिंग अगोदरच स्कूटरची माहिती लिक झाल्याची कळतंय. Honda Activa 6G ची माहिती अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये जारी करण्यात आली आहे. या माहितीनुसार या स्कूटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पण कंपनीकडून याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. 

 

हे आहेत नवीन फीचर्स
होंडा अॅक्टिवा 6G मध्ये नवीन डिझाइनची स्पोर्टी लुक असलेली हेडलाइट असणार आहे. हिचा लुक अॅक्टिवा 125 सारखा असेल. याच्या फ्रंटला डिस्क तर रिअरमध्ये ड्रम ब्रेक असणार आहे. नवीन सेफ्टी नॉर्म्स अंतर्गत या स्कूटरमध्ये सीबीएस (Combined Braking System)देण्याची शक्यता आहे.  यामध्ये डिजिटल डॉयल मिळणार असून वरील भाग हा अॅनॉलॉग असेल. यामध्ये 120 किमीचा स्पीडो मीटर देण्यात येईल. स्कूटरमध्ये बीएस-6 नॉर्म्सचे 125 सीसीचे पेट्रोल इंजिन असेल. 

बातम्या आणखी आहेत...