आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

61 हजारांच्या Activa वर 63500 चा दंड, गाडी विकताना केलेली चूक जुन्या मालकाला पडली महागात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - म्हैसूर ट्राफिक पोलिसांना एका होंडा अॅक्टीव्हा स्कूटरला तब्बल 63,500 कोटींचा दंड ठोठावला आहे. या अॅक्टीव्हावर वाहतुकीचे नियम मोडल्याची तब्बल 635 प्रकरणे दाखल आहेत. त्यामुले दंडाची एकूण रक्कम 63,500 झाली आहे. ही गाडी 2015 मधील आहे. त्यानुसार या गाडीच्या मूळ कितमीपेक्षा दंडाची रक्कम अधिक आहे. म्हैसूरमध्ये नव्या अॅक्टीव्हाची किंमत 61,688 पासून पुढे आहे. 


असे आहे प्रकरण 
ट्राफिक पोलिसांनी KA09HD4732 क्रमांकाची चालकाने हेल्मेट परिधान केलेले नसल्याचे अडवली. पण जेव्हा दंड लावण्यासाठी गाडीचा क्रमांक डाटाबेसमध्ये टाकला तेव्हा या गाडीने वाहतुकीचे निमय मोडल्याची 635 प्रकरणे समोर आली. म्हणजे या गाडीवर आधीचाच 63500 रूपयांचा दंड साचलेला होता. त्यावेळी गाडी चालवणारा गाडी सोडून पळाला. रेकॉर्डमध्ये स्कूटर के. मधुप्रसाद नावाने रजिस्टर होती. पण त्यांनी ती स्कूटर विकली होती. पण जर मालकाने 'डिलिव्हरी नोट' शिवाय स्कूटर विकली असेल तर त्यालाच दंड भरावा लागतो. गाडी विकणाऱ्याने गाडी देण्यापूर्वी त्याने साईन केलेला डिलिव्हरी नोट घेणे ही त्याचीच जबाबदारी असते. 


जुनी गाडी खरेदी विक्री करताना लक्षात ठेवा या 4 बाबी 
1. जुनी गाडी खरेदी किंवा विक्री करताना तिचे पेपर्स तपासून घ्या. गाडीच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटबरोबर विमा काढलेला असणे गरजेचे आहे. तसेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC)देखिल असायला हवी. शक्य असल्यास अॅग्रिमेंटही तयार करून घ्यायला हवे. 
2. जुनी गाडी खरेदी किंवा विक्रीनंतर RTO मध्ये जाऊन तिचे ओनर डिटेल्सही बदलायला हवे. तसे केले नाही तर गाडी जुन्याच मालकाच्या नावावर राहते. अशावेळी त्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकते. 

3. गाडीच्या विमा एजन्सीकडून जुने रेकॉर्डही चेक करायला हवे. म्हणजे काही अॅक्सिडेंट तर झालेला नाही हे पाहावे. किंवा काही कायदेशीर कारवाई सुरू आहे का, ते पाहावे. 

4. गाडीचे मॉडेल मॉडीफाय केले असेल तर ती खरेदी करणे टाळा. कारण बदल केल्यानंतर RTO ला त्याची माहिती द्यावी लागते. अन्यथा कारवाई होऊ शकते. 

5. जुन्या गाडीचे ब्रेक, ऑइल लीकेज, गंज, क्लच, चेन, टायर्स आणि फ्यूल टँकही चेक करायला हवी. यापैकी एखादा पार्ट नादुरुस्त असेल तर तुम्हाला खर्च करावा लागू शकतो. 

बातम्या आणखी आहेत...