Home | Business | Auto | honda civic 2019 launch in india

होंडा कार्सची आयकॉनिक होंडा सिव्हिक लाँच 

वृत्तसंस्था | Update - Mar 10, 2019, 12:03 AM IST

अग्रगण्य कंपनीने आयकॉनिक आणि बहुप्रतीक्षित ऑल-न्यू टेंथ जनरेशन होंडा सिव्हिक भारतातील बाजारपेठेत आणली.

  • honda civic 2019 launch in india

    नवी दिल्ली - होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या भारतातील प्रीमियम कार्सचे उत्पादन करणाऱ्या अग्रगण्य कंपनीने आयकॉनिक आणि बहुप्रतीक्षित ऑल-न्यू टेंथ जनरेशन होंडा सिव्हिक भारतातील बाजारपेठेत आणली. लक्षवेधी दणकट डिझाइन, शक्तिशाली ड्रायव्हिंग कामगिरी, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान व नवकल्पनांचा अद्ययावत संच, अव्वल दर्जा व सुधारित अंतर्गत रचना यांच्या माध्यमातून सर्व ग्राहक चालकांना पूर्णपणे नवा अनुभव देण्याचा वादा होंडा सिव्हिक करते.


    सिव्हिक ही होंडाची सर्वात दूरवर धावलेली गाडी असून जगभरातील सर्वाधिक खप असलेले मॉडेल आहे. भारतातील ग्राहकांपुढे ऑल न्यू होंडा सिव्हिक सादर करताना होंडा कार्स इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी गाकू नाकानिशी म्हणाले, "आमची जगातील सर्वोत्तम विक्री असलेली तशीच प्रतिष्ठेची होंडा सिव्हिक भारतात आणून भारतातील आमची उत्पादन श्रेणी विस्तारित करताना आम्हाला आनंद होत आहे. २०१९ मध्ये होंडाने आणलेले हे तिसरे नवीन मॉडेल आहे. सिव्हिक लाँच केल्यामुळे भारतातील आमचा अव्वल दर्जाच्या सेडान गाड्यांचा लाइन-अप पूर्ण झाला आहे."

Trending