आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडाची बीएस - 6 मोटारसायकल एसपी लाँच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने नवी अॅक्टिव्हा १२५ नंतर भारतात आपली दुसरी बीएस६ कंप्लायंट टू-व्हीलर एसपी १२५ लाँच केली आहे. होंडा एसपी १२५ ची सुरुवातीची किंमत ७२,९०० रुपये(एक्स-शोरूम) आहे. होंडा या मोटारसायकलवर ६ वर्षांची वॉरंटी पॅकेज देऊ करत आहे. होंडाची ही मोटारसायकल ड्रम आणि डिस्क दोन प्रकार उपलब्ध आहे. होंडा एसपी १२५ बाइक चार वेगवेगळ्या रंगात(स्ट्रायकिंग ग्रीन, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, पर्ल सिरेन ब्ल्यू आणि इंपिरियल रेड मेटॅलिक) पर्यायात आहे. अॅक्टिव्हा १२५ स्कूटरप्रमाणे होंडाची ही बाइक सायलेंट एसीजी स्टार्टर आणि ईएसपी तंत्रज्ञानयुक्त आहे. होंडाच्या दाव्यानुसार, इंटिग्रेटेड हेडलँप बीम आणि पासिंग स्विचसोबत येणाऱ्या आपल्या प्रकारातील ही पहिली मोटारसायकल आहे.

१६% मायलेज देईल
होंडाच्या दाव्यानुसार, नवी होंडा एसपी १२५ बीएस बाइक १६ टक्के जास्त मायलेज आणि पर्यावरणपूरक राइड देईल. होंडा एसपी १२५ मध्ये नव्या फ्रेम, ऑल-एलईडी हेडलँप, एफआय इंडिकेटरसोबत क्लास लिडिंग डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...