Home | Business | Auto | honda wrv and brv facelift launched know all about the features

होंडाने लाँच केले City, WR-V आणि BR-V चे स्‍पेशल एडि‍शन मॉडेल, अनेक नवे फिचर्स मिळणार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 11, 2018, 12:04 AM IST

तिन्ही स्‍पेशल एडि‍शन मॉडेल्‍सना स्‍पोर्टी अपडेट आणि नव्या फिचर्ससह सादर करण्यात आले आहे.

 • honda wrv and brv facelift launched know all about the features

  नवी दि‍ल्‍ली - होंडा कार्स इंडि‍याने इंडि‍यन मार्केटमध्ये City, WR-V आणि BR-V चे स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केले आहेत. यांची नावे होंडा सि‍टी ऐज, डब्‍ल्‍यूआर-व्ही अलाइव्ह आणि बीआर-व्ही स्‍टाइल ठेवण्यात आले आहे. या तिन्ही स्‍पेशल एडि‍शन मॉडेल्‍सना स्‍पोर्टी अपडेट आणि नव्या फिचर्ससह सादर करण्यात आले आहे. हे मॉडेल्स लाँच करून कंपनी त्यांचा सेल्स बूस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.

  होंडा सि‍टी ऐज..
  होंडा सि‍टी ऐज एडि‍शन SV ट्रि‍म व्हेरीएंट बेस्ट आहे. सि‍टी ऐजमध्ये स्‍पेशल एडि‍शन लोगो, रि‍व्हर्स पार्किंग सेन्सर, IRVM डि‍स्‍प्‍लेसह रिव्हर्स कॅमेरा आणि 15 इंच डायमंड कट अलॉय व्‍हील्‍स असे अॅडिशनल फिचर्स आहेत.

  पेट्रोल आणि डिझेस दोन्ही व्हेरीएंट उपलब्ध होतील. पण केवळ मॅन्युअल गीअरबॉक्‍ससह मिळेल. त्याच्या पेट्रोल व्हेरि‍एंटची किंमत 9.75 लाख आणि डिझेल व्हेरीएंटची किंमत 11.10 लाख रुपए (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली) ठेवली आहे.


  पुढे वाचा इतर कारच्या फिचर्सबाबत..

 • honda wrv and brv facelift launched know all about the features

  होंडा डब्‍ल्‍यूआर-व्ही अलाइव्ह 
  होंडा डब्‍ल्‍यूआर-व्ही अलाइन एडिशन एस ट्रिम मॉडेल बेस्ड आहे. या कारमध्ये अॅडिशनल फिचर्सचा विचार करता अलाइव्ह लोगो, रि‍व्हर्स पार्किंग सेन्सर्स, IRVM डि‍स्‍प्‍लेसह रिव्हर्स कॅमेरा आणि 16 इंच डायमंड कट अलॉय व्हील्स आहेत. 


  इंटेरियरमध्ये सीट कव्हर आणि प्रीमि‍यम स्‍टेअरिंग व्‍हील कव्हर आहे. डब्ल्यूआर-व्ही ला नवीन रेड मेटॅलि‍क कलरही दिलेला आहे. या कारच्या स्पेशल एडिशनसह एका महिन्याचे फ्री होंडा कनेक्‍ट सब्‍सक्रि‍प्‍शन मिळत आहे. 


  सि‍टी ऐजप्रमाणेच यातही फक्त मॅन्युअल गीअरबॉक्‍समध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हर्जनची किंमत 8.02 लाख तर डिझेल व्हर्जनची किंमत 9.11 लाख आहे. 

   

   

 • honda wrv and brv facelift launched know all about the features

  होंडा बीआर-व्ही स्‍टाइल 
  सर्व व्हेरीएंट्समद्ये उपलब्ध आहे. बीआर-व्ही स्‍टाइलमध्ये स्‍पेशल एडि‍शन लोगो, फ्रंट गार्ड, साइड मोल्‍डिंग, टेलगेट स्‍पॉयलर आणि फ्रंट-रीयर बंपर प्रोटेक्‍शन सारखे फिचर्स आहेत. होंडा बीआर-व्ही स्‍टाइलची किंमत 10.44 लाख (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली) पासून सुरू होते. 

Trending