आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवर होंडाची 5 लाख, महिंद्राची 4 लाख, मारुतीची 72,500 रुपयांची सूट

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

दिल्ली : मंदीतून बाहेर पडण्यासाठी वाहन क्षेत्राने आता सणासुदीनंतर वर्षअखेरीस आपला स्टॉक क्लिअरन्ससाठी सवलत देऊ केली. ऑटो कंपन्या ग्राहकांना कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस व कॉर्पाेरेट बोनससारख्या ऑफर्ससह रोड साइड असिस्टन्स, स्वस्त कर्ज व बायबॅकसारखी ऑफर देत आहे. कार निर्माती कंपनी होंडा सर्वाधिक ५ लाख रुपये सूट देत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा हॅपिएस्ट डिसेंबर ऑफरअंतर्गत कारवर ४ लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. ह्युनडे २ लाख रु, टाटा १.६५ लाख, निसान १.१५ लाख आणि मारुतीने ७२,५०० रुपयांची विविध सवलत दिली आहे. बहुतांश कंपन्यांनी ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत दिली आहे. तज्ञांनुसार, या वेळी मंदीचा दबाव कंपन्यांवर आहे. त्यामुळे स्टॉक क्लिअरन्ससाठी जास्त सूट दिली जात आहे. भोपाळ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशिष पांडे यांनी सांगितले की, ऑटोमोबाइल क्षेत्र अनेक आव्हानांचा सामना करत आहे. त्यामुळे डिलर्सपासून कंपन्यांपर्यंत सर्वांना लवकर स्टॉक क्लीयरन्स हवे आहे. सध्या सवलत ग्राहकांना गाडी खरेदीसाठी आकर्षित करेल. निसान मोटार इंडिया प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, सामान्यपणे दरवर्षी कंपन्या डिस्काउंट ऑफर काढतात, मात्र या वेळी सर्वांचा जोर विक्री वाढवण्यावर आहे. रेड वीकेंडमध्ये ४० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, एक कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस जपानी कार उत्पादक कंपनी निसान रेड वीकेंड ऑफर घेऊन आली आहे. याअंतर्गत ४० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट दिले जात आहे. निसान किक्सवर २०,५०० रुपयांत एक्सटेंडेड वॉरंटी व १५०० शहरांत रोडसाइड मदतही दिली जात आहे.

मारुती मॉडेल - सूट


स्विफ्ट - ५२,६००
आल्टो ८००- ५५१००
वॅगनआर- ७०,१००
बलेनो- ३२०००

महिंद्रा अँड महिंद्रा मॉडेल- सूट


अल्ट्रस- ४ लाख
एक्सयूव्ही ५००- १.६७ लाख
स्कॉर्पिओ-१.३० लाख
बोलेरो-३४१००

ह्यूनडे- मॉडेल-सूट


एलेंट्रा-२.०५ लाख
क्रेटा व एक्सेंट - १ लाख
ग्रँड आय १०- ८० हजार
सेंट्रो- ६० हजार

टाटा- मॉडेल- सूट


हॅरियर- १ लाख
हेक्सा-१.६५ लाख
टियागो पेट्रोल -२५ हजार
टिगोर-५५ हजार

सूचना : सवलतीत विविध एक्स्चेंज बोनस, कॅश डिस्काउंट, काॅर्पाेरेट डिस्काउंट, व्याज सूट समाविष्ट. शहर व मॉडेलनुसार यात फरक येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...