Home | National | Other State | 'Honey Trap' of ISI; 45 Indian soldiers got trap

'आयएसआय'चा हनी ट्रॅप; 45 भारतीय जवान फसले; व्हिडिओ कॉल करून महिला नग्नावस्थेत नृत्य करायची 

डी. डी. वैष्णव | Update - Jan 13, 2019, 10:25 AM IST

महिलेने 'अनिका चोप्रा' नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून भारतीय जवानांशी मैत्री वाढवली होती.त्यात जवान अडकत गेले.

  • 'Honey Trap' of ISI; 45 Indian soldiers got trap

    जोधपूर- पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या महिला एजंटने जैसलमेर लष्करी तळावर सोमवीरसिंग या जवानास जाळ्यात ओढून महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. इतकेच नव्हे तर या हनी ट्रॅपमध्ये तब्बल ४५ जवान अडकले असल्याचे चौकशीतून समोर आले.

    जवानांकडून माहिती काढून घेण्यासाठी ती व्हिडिओ कॉल करून नग्नावस्थेत नृत्य करत असे. हे जवान महत्त्वाच्या विभागांत व लष्करी तळांवर तैनात होते. प्रशासकीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार सोमवीरवर गुन्हा दाखल करून अटक केली.

    या महिलेने 'अनिका चोप्रा' नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून भारतीय जवानांशी मैत्री वाढवली. यात हे जवान अडकत गेले. सोमवीर २०१६ मध्ये अनिकाच्या जाळ्यात अडकला. यानंतर फेसबुकवरील फ्रेंड लिस्टमधील इतर जवानांशी मैत्री वाढवली. त्यामुळे या सर्व जवानांची कसून चौकशी सुरू आहे. राजस्थान सीआयडीसह जोधपूरच्या यंत्रणाही ही चौकशी करत आहेत. आतापर्यंत नेमकी कोणती माहिती बाहेर गेली हे आता स्पष्ट होईल.

Trending