आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मधाने दूर होतील चेहऱ्याच्या विविध समस्या

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मध खाण्याचे जितके फायदे असतात तितकेच फायदे ते त्वचेवर लावण्याने होतात. अर्धा चमचा मध जरी तुम्ही चेहऱ्यावर लावला तरी तुमचे सौंदर्य खुलेल आणि चेहरा उजळेल.

  • टॅनिंग

अर्धा चमचा मधात लिंबूचा रस आणि अर्धा चमचा बदामाचे तेल मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. ८० टक्के वाळल्यावर थोडे पाणी लावून मसाज करावी. नंतर धुवून टाकावे. आठवड्यातून दोनदा करावे, यामुळे चेहरा उजळेल.

  • काळे डाग

चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बेसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल. मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यातही सहायक ठरतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे.

  • ब्लॅकहेड्स

अर्धा चमचा मधात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर पाणी शिंपडा त्यानंतर ती पेस्ट लावा. त्यानंतर हलक्या हाताने रगडा. ४ ते ५ मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स दूर होतात.

  • पुरळ

मध पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरतो. गुलाब जल, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. शिवाय अर्धा चमचा मधात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट पिंपल्सवर लावा.