आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमची शिष्या हनीप्रीतची जामिनावर सुटका, 2017 मध्ये हिंसाचार प्रकरणात अटक केले होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात राम रहीमला 25 ऑगस्ट 2017 ला शिक्षा सुनावली
  • पंचकुलातील हिंसाचारात 36 जणांचा जीव गेला
  • 2 नोव्हेंबरला हनीप्रीतवरील देशद्रोहाचा खटला रद्द करण्यात आला

चंडीगड- डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमची शिष्या हनीप्रीतला सीजेएम कोर्टाने आज(बुधवार) पंचकुला हिंसाचार प्रकरणात जामीन मंजुर केला. त्यानंतर अंबाला जेलमधून हनीप्रीतची सुटका करण्यात आली. दरम्यान, हनीप्रीतच्या सुरक्षेसाठी अंबाला पोलिस तैणात करण्यात आले आहेत.
यापुर्वी 2 नोव्हेंबरला हनीप्रीतसहित 15 आरोपींवरील देशद्रोहाचा खटला रद्द करण्यात आला होता. त्यानंतर हनीप्रीतने जामिन अर्ज दाखल केला होता. प्रकरणाची पुढील सुनावनी 20 नोव्हेंबरला होईल.

सीजेएम कोर्टात ट्रांसफर केला खटला
 
शनिवारी पंचकुला कोर्टाने आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम 216, 145, 150, 151, 152, 153 आणि 120बी अंतर्गत आरोल लावले होते. खटल्याला सीजेएम कोर्टात ट्रांसफर केले होते. साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर 25 ऑगस्ट 2017 ला पंचकुलामध्ये मोठा हिंसाचार भडकला होता, यात 36 जणांना आपला जीम गमवावा लागलाह होता. पोलिसांनी दंगे भडकवल्याच्या आरोपाखाली हनीप्रीतला अटक केली होते.1200 पानांची चार्जशीट
 
पोलिसांनी सुरुवातील 1200 पानांची चार्जशीट सादर केली होती. ज्या आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल होती, त्यात हनीप्रीत, तिचा साथीदार सुखदीप कौर, राकेश कुमार अरोड़ा, सुरेंद्र धीमान इंसा, चमकौर सिंह, दान सिंह, गोविंद राम, प्रदीप गोयल इंसा आणि खैराती लाल सामील होते.