आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्कवर बंदी; हजारोंनी मास्क घालत दर्शवला विरोध, चार महिन्यांपासून होत आहे सरकारचा विरोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँग- हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थक निदर्शकांना मास्क घालण्यास मनाई केल्यावरून हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले. हिंसा उसळल्यानंतर रेल्वेसेवा बंद करण्यात आली. हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांनी सरकारविरोधी निदर्शनांवर कडक धोरण अवलंबत शुक्रवारी निदर्शनांदरम्यान मास्क घालण्यास बंदी घातली होती, यामुळे हजारो निदर्शकांनी मास्क घालून विरोध दर्शवला.निदर्शकांनी संपूर्ण हाँगकाँगमध्ये मेट्रो स्थानकांवर तोडफोड करत आग लावली. तसेच, ‘हाँगकाँगचे लोक विरोध करतील’ अशा घोषणा दिल्या. लॅम यांच्या घोषणेनंतर निदर्शकांची संख्या वाढली. निदर्शकांचे म्हणणे आहे की, त्यांना घाबरवता येणार नाही. ही मनाई हास्यास्पद असून यातून सरकारची असमर्थता दिसत आहे. यातून स्पष्ट जाणवते की, सरकारला आमचे म्हणने ऐकून घ्यायचे नाही. ते फक्त गोष्टी बिघडवत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. हाँगकाँगमध्ये निदर्शनांना ११८ दिवस झाले आहेत. पोलिसांनी २००० पेक्षा जास्त लोकांना पकडले आहे. ३००० राउंड अश्रुधुराच्या नळ्या फोडण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...