आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 जानेवारीला भारतात लाँच होणार 48 मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन, 15 जानेवारीपासून करू शकता बुकिंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : हूआवेईचा उप ब्रँड असलेल्या ऑनरने जगातील पहिला पंच होल डिस्प्ले फोन 'व्ह्यू 20' भारतीय बाजारपेठेत लाँच करत आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. 29 जानेवारी रोजी 40 हजार रूपयांच्या किंमतीसह हा फोन लाँच होणार आहे. अॅमेझॉन इंडीयावरून या फोनची खरेदी करता येणार असून 15 जानेवारी पासून याची प्री-बुकिंग सुरू होत आहे. 


मागील वर्षी डिसेंबरमध्ये केली होती घोषणा
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हाँगकाँग येथील ऑनरच्या आटरेलॉजीमध्ये या फोनची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये नवीन फूल-व्ह्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीच्या मते या फोनमध्ये जगामध्ये प्रथमच वापरण्यात आलेल्या आठ तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 1.4 जीबीपीएस कॅट 21. मोडेमचा समावेश आहे. 

 

जगातील पहिला इन-स्क्रीन फ्रंट कॅमेरा डिझाइन

या फोनमध्ये इन-स्क्रीन फ्रंट कॅमेरा डिझाइन असल्याचे कंपनीने डिसेंबरमध्येच सांगितले होते. ही डिझाइन 18 थरांच्या प्रायोगिक चाचणीद्वारे प्राप्त करण्यात आली आहे. यामध्ये अत्यंत सावधानीपूर्वक कॅमेरा लावण्यात आला आहे. यामुळे डिस्प्लेची जागा 100 टक्के झाली आहे. 

 

आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर काम करेल हे डिवाइस

या डिवाइसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) कॉम्प्यूटिंग पावर आणि ग्राफिक प्रोसेसिंग पावर आहे. याला हुआवेईने स्वतः किरिन 980 चिपसेटच्या ड्युअल-आयएसपी आणि ड्युअल-एनपीयूद्वारे सक्षम बनविण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...