Home | National | Other State | Honor Killing case court sentenced capital punishment to brother

ऑनर किलिंग: परजातीत लग्न केल्याने बहिणीची हत्या करणाऱ्या भावाला झाली फाशीची शिक्षा, बहिणीला सुसाइड नोट लिहायला लावून पाजले विष...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 03:24 PM IST

न्यायाधीश म्हणाले- बहिणीचे रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य आहे, तिला मारणे नाही.

 • Honor Killing case court sentenced capital punishment to brother

  हिसार- दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत लग्न केल्यामुळे बहिणीला मारून तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायाधीश (एडीजे) डॉ. पंकज यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. जुगलान गावातील किरण(21)ला 9 फेब्रुवारी 2017 मध्ये विष देऊन मारले होते, आणि तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. 14 फेब्रुवारीला किरणच्या वडिलांनी पोसिसांत तक्रार दाखल केली.


  - दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न केल्याने कुटुंबाची तथाकथित प्रतिष्ठा धुळीला मिळवली असे म्हणत रागाच्या भरात बहिणीची हत्या केल्याचे भावाने कबूल केले आहे. बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. कास्ट सिस्टीम देशाला लागलेली कीड आहे, याला कायमचे संपवावे लागेल. जाणूनबुजून केलेल्या या गुन्ह्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा मिळायला हवी होती आणि त्यामुळेच आऱोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, असे न्यायाधीशांनी सुनावणीच्या वेळी म्हटले आहे.

  नवऱ्याने साक्ष देण्यास नकार दिला, पण ट्रस्टच्या अध्यक्षांनी लढली न्यायालयीन लढाई

  - किरणचा नवरा रोहताशने कोर्टात साक्ष देण्यास नकार दिला पण त्यांचा विवाह ज्या सनातन धर्माच्या चॅरिटेबल ट्रस्टने लावला होता त्याचे अध्यक्ष संजय चौहान यांनी अर्ज दाखल करून साक्ष नोंदवली.

  बहिणाच्या हातून सुसाइड नोट लिहून पाजले विष

  - पोलिसांनी याची चौकशी केल्यावर किरणच्या वडीलांनी सांगितले की, तिने स्वत ने विष पिले होते पण पोलिसांनी तिच्या अस्थीची फॉरेंसिक तपासणी केल्यावर कळाले कळाले की हा खून होता.


  - आरोपीने नंतर कबूल केले की, समाजात परिवाराची प्रतिष्ठा जाईल म्हणून तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून सुसाइड नोट लिहून घेतली आणि नंतर तिला विष पाजले.

  - किरणचा भाऊ अशोकने पहिले पोलिसांना किरणचा नैसर्गिक मृत्यु झाल्याचे सांगितले, नंतर सुसाइड नोट दाखवून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले आणि मृतदेहाला जाळण्याचा प्रयत्न केला. पण चौकशी दरम्यान त्याने ऑनर किलिंगचे कबूल केले. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Trending