आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमी युगुलाची हत्या करून मृतदेह झाडांना लटकवले, तरुणीचे कुटुंबीय फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा(उत्तर प्रदेश)- नया गाव भागातील दादू असगरपूर गावात प्रेमी युगुलाचे मृतदेह झाडाला लडकलेल्या अवस्थेत आढळले. दोघांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना घडल्यापासूनच तरूणीचे कुटुंबीय फरार झाले आहेत. प्राथमिक तपासात ऑनर किलींगचा संशय पोलिसांना आहे.  


कायमपूरमधील रहिवासी सत्य प्रकाश उर्फ दिनेश यादव(23) आणि लादमपूर कटाराची रहिवासी पुजा बृजेश(20) यांचे अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते. कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमाची माहिती मिळताच त्यांनी याला विरोध केला होता.

 

दोघांचे पाय जमिनीला टेकलेले होते
पोलिसांनी सांगितल्यानुसार 15 दिवसांपूर्वी पुजा घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर पुजाचे लग्न सत्यप्रकाशसोबत लावून देतो असे सांगून पुजाच्या कुटुंबीयांनी तिला परत बोलवले. तीन दिवसांपूर्वी त्यांनी सत्यप्रकाशलाही त्यांच्या घरी बोलवून घेतले. सोमवारी संध्याकाळी त्याला त्याच्या भावाचा फोन आला आणि तो सकीट या गावाला गेला. त्यानंतर त्या दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. ग्रामस्थानी त्यांचे मृतदेह पाहून घटनेची माहिती पोलिसांना दिली.