Maharashtra Crime / आशीर्वाद घेण्यासाठी वाकलेल्या मुलीचा निर्दयी बापाने कापला गळा, प्रेम विवाह केल्यामुळे नाराज होते कुटुंबीय


लग्न झाल्यावर समाजातील कार्यक्रमात न जाण्याची ताकिद दिली होती

दिव्य मराठी

Jul 16,2019 12:18:58 PM IST

मुंबई- शहरातील घाटकोपर परिसरात दोन दिवसांपूर्वी मिळालेल्या 20 वर्षीय गरोदर महिलेच्या मृतदेहाचा खुलासा झाला आहे. चौकशीत समोर आले की, महिलेने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन, आंतरजातीय विवाह केल्यामुळे कुटुंबीय नाराज होते. त्यामुळे महिलेच्या वडिलांनीच तिचा गळा कापला. पोलिसांनी रक्ताने माखलेल्या महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी फुटपाथवर आढळला होता. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.

पोलिसांनी सांगितले की, मीनाक्षी चौरसिया चार महिन्यांची गरोदर होती. शनिवारी तिचे वडील राजकुमार चौरसियाने मुलीच्या चेहरा आणि डोक्यावर अनेक वार केले, त्यातच तिचा मृत्यू झाला.


कुटुंबीयांविरुद्ध केले होते लग्न
जोन-7 डीसीपी अखिलेश सिंह यांनी सांगितले की, "आम्हाला सांगण्यात आले की, फेब्रुवारीत हे लोक मध्य प्रदेशच्या सतनामध्ये गेले होते. तिथे मीनाक्षीने बृजेश नावाच्या तरुणाशी कोर्ट मॅरेज केले. पण इकडे मीनाक्षीच्या वडिलांनी तिचे लग्न विरारमधील एका तरुणाशी ठरवले होते. तिच्या लग्नाची पूर्ण तयारी झाली होती आणि कार्डदेखील सगळ्यांना वाटले होते. पण प्रेम विवाह केल्यामुळे राजकुमार नाराज झाले. मीनाक्षीने बृजेशसोबत पळून जाऊन लग्न केल्यामुळे आणि त्यांनी ठरवलेले लग्न मोडल्यामुळे त्यांनी त्यांना खूप लाजिरवाणे वाटू लागले. पण त्यानंतर त्या लग्नाचा स्विकार करून मुलीला बृजेशसोबत आपल्या गावी किंवा समाजातील कोणत्याही कार्यक्रमात न जाण्याची ताकीद दिली. पण काही दिवसांपूर्वी मीनाक्षी त्यांच्या गावी एका कार्यक्रमात गेली आणि यामुळे नाराज झालेल्या वडिलांसोबत तिचा फोनवरून वाद झाला. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला भेटायला बोलवले. मीनाक्षी वडिलांना भेटायला आली आणि ती जेव्हा वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकली, त्यांनी धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले आणि त्यात तिचा मृत्यू झाला."

X