आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Hope Survives After Chandrayan 2 Crash Landing, Now Waiting For Morning On Moon To Contact Lander Vikram!

इस्राेची क्रॅश लँडिंगनंतरही आशा जिवंत, लँडर विक्रमशी संपर्कासाठी आता चंद्रावर सकाळ होण्याची प्रतीक्षा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - भारतीय अंतराळ संस्था इस्रोने अजूनही चांद्रयान- २ च्या लँडरशी संपर्काची आशा सोडलेली नाही. विक्रममध्ये प्राण आणण्यासाठी इस्रो दिवसरात्र प्रयत्न करत आहे. मात्र, यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागू शकते. इस्रो प्रमुख सिवन यांनी मंगळवारी सांगितले की, चंद्राच्या ज्या दिशेला आम्ही लँड केले, तेथे रात्र आहे. यामुळे संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. सिवन यांनी सांगितले की, चंद्रावर मोठी रात्र पडल्याने दहा दिवसांपूर्वी संपर्काचे प्रयत्न थांबवण्यात आले होते. चंद्रावर येत्या काळात रात्र संपेल. तेव्हा आम्ही लँडरशी पुन्हा संपर्काचे प्रयत्न सुरू करणार. चांद्रयान- २ च्या लाँचिंगच्या आधी इस्रोने माहिती दिली होती की, लँडर आणि रोव्हरचे मोहिमेतील आयुष्य एक चंद्र दिवसाबरोबर होते, जे पृथ्वीवरील १४ दिवसांबरोबर होते. काही तज्ञांच्या मतानुसार एवढ्या दिवसांनंतर लँडरशी संपर्क साधणे खूप कठीण जाईल. इस्रोच्या अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, एवढ्या दिवसांनंतर संपर्क साधणे खूपच कठीण होईल. मात्र, प्रयत्न करण्यात अडचण नाही. गेल्या ७ सप्टेंबरला लँडर विक्रम शेवटच्या क्षणी लँडिंग करताना कोसळला होता. यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रोव्हर प्रज्ञान अजूनही लँडरमध्येच आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगच्या काही मिनिटे आधी विक्रमशी संपर्क तुटला होता. नासानेही पुन्हा प्रयत्न करण्याचे म्हटले होते. याआधीही त्यांनी ऑर्बिटरच्या माध्यमातून संपर्काचे प्रयत्न केले होते.
 

थंडी व भूकंपाचे धक्के लँडरसाठी मोठे आव्हान, नुकसान शक्य 
इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चंद्रावर रात्री लँडरला समस्या येतील. या वेळी तेथे खूप थंडी असेल. तसेच तेथे जाणवणारे भूकंपाचे धक्के चिंता वाढवतील. त्यांनी सांगितले की, लँडर विक्रम वेगात पृष्ठभागावर धडकला होता, यामुळे त्याच्या आतील भागातही खूप नुकसान झाले असेल.

बातम्या आणखी आहेत...