• Home
  • National
  • Hope to get contact with Vikram Lander is over; Orbiter's work, however, is accurate

चांद्रयान 2 / विक्रम लँडरशी संपर्काची आशा मावळली, ऑर्बिटरचे काम मात्र चोख; आता या नवीन मिशनची तयारी

चांद्रयान मोहिमेत मिळालेले ९८ टक्क्यांहून अधिक यश पाहता आता गगनयान मोहिमेची तयारी इस्रोने सुरू केली आहे

Sep 22,2019 08:32:34 AM IST

बंगळुरू - भारताच्या चांद्रयान मोहिमेत अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्रावर लँड होताना संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क स्थापित करण्याची आशा आता चंद्रावर रात्र झाल्याने मावळली असली तरी चंद्राभोवती भ्रमण करत असलेले ऑर्बिटर मात्र आपले काम चोख बजावत आहे. ८ उपकरणे या ऑर्बिटरवर असून ती उत्तम कार्य करत असल्याचे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितले. चांद्रयान मोहिमेत मिळालेले ९८ टक्क्यांहून
अधिक यश पाहता आता गगनयान मोहिमेची तयारी इस्रोने सुरू केली आहे.


चंद्रावर आता १४ दिवसांची रात्र सुरू झाली आहे आणि तापमान उणे १८३ अंशावर येईल. या स्थितीत लँडरशी संपर्क अशक्य आहे. दरम्यान, भारताचे ऑर्बिटरने फोटो पाठवण्यास सुरुवात केली असून हे ऑर्बिटर चंद्रावर थ्री-डी मॅपिंगसह दक्षिण ध्रुवावर पाणी, बर्फ आणि मिनरल्स शोधण्याचे काम करेल. ऑर्बिटरचा कार्यकाळ एक वर्षांचा असणार आहे. ६ सप्टेंबरला भारतीय लँडर चंद्रावर उतरणार होते. मात्र, त्याचा अगदी शेवटच्या क्षणी संपर्क
तुटला. यानंतर नासाच्या चंद्राभोवती भ्रमण करत असलेल्या उपग्रहामार्फत लँडरची नेमकी स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, चंद्रावर सायंकाळ झाल्याने त्यात यश आले नव्हते.

X