आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी दिवसाची सुरुवात पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या योगाने आज 12 पैकी 5 राशींसाठी चांगले योग जुळून येत आहेत. उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील. मेष : शुभ रंग : मोतिया | अंक : ५ हौशी मंडळींना आज जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ लाभेल. वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : १ आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. गृहीणी जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील. मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ३ आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अती स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. काही गुपिते उघड होतील. कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ७ पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमधे मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे. सिंह : शुभ रंग : राखाडी| अंक : ९ अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेवता येतील. योग्य माणसे संपर्कात येतील. काही महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे. कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८ आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक बघायला हवी. तूळ : शुभ रंग : लाल | अंक : १ कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस. वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २ व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित. धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : ४ आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको. मकर : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ६ हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चूकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. आज वैवाहीक जिवनांत जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत. कुंभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३ वैवाहीक जिवनांत असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. व्यवसायाच्या ठीकाणी भागिदारांशी सलोखा राहील. आनंदी दिवस. मीन : शुभ रंग : क्रिम| अंक : ५ नोकरदारांना आज वरीष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. अधिकाऱ्यांना कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालावे लागेल. ज्येष्ठांना डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत.

बातम्या आणखी आहेत...