आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिफळ : मेष राशीच्या लोकांना लाभ आणि मीन राशीला होऊ शकते नुकसान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी मकरसंक्रांती अमृतसिद्धी, सर्वार्थसिद्धी आणि रवी योगामध्ये साजरी केली जाईल. या दिवशी अश्विनी नक्षत्र योगही राहील, हा मंगलकारी योग आहे. 14 जानेवारीला रात्री सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाळ 15 जानेवारीला राहील. भोपाळचे ज्योतिषाचार्य पं. भंवरलाल शर्मा यांच्यानुसार या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायण होईल. संक्रांतीचे वाहन सिंह आणि उपवाहन हत्ती राहील. यामुळे महागाईला अंकुश लागेल. व्यापारात लाभ होईल.


विशेष पुण्यकाळ दुपारी 2.30 पर्यंत
पं. शर्मा यांच्यानुसार मकर संक्रांतीचा पुण्यकाळ 15 जानेवारीला सूर्योदयापासून सुरु होईल. विशेष पुण्यकाळ दुपारी 2.30 पर्यंत तर सामान्य पुण्यकाळ सूर्यास्तापर्यंत राहील.


यामुळे बदलतात मकरसंक्रांतीच्या तारखा
ज्योतिषी अंजना गुप्ता यांच्यानुसार सूर्य उत्तरायण झाल्यानंतर भारतासहित सूर्याच्या उत्तर गोलार्ध क्षेत्रामध्ये सूर्याची किरणे सरळ पडल्यामुळे ऋतू परिवर्तन होते. ग्रीष्म ऋतू सुरु झाल्यामुळे दिवस मोठा आणि रात्र छोटी होते. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना 72 पासून 90 अंशामध्ये एक डिग्री मागे जाते. यामुळे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेशाचा दिवस आणि वेळ बदलत राहतो. वर्ष 2014 ते 2016 पर्यंत मकरसंक्रांती 14 जानेवारीला साजरी करण्यात आली, परंतु 2017 आणि 2018 मध्ये 15 जानेवारीला साजरी करण्यात आली होती.


असा राहणार राशींवर प्रभाव
मेष- शुभ
वृष- संतोष
मिथुन- धन वृद्धी
कर्क- असंतोष
सिंह- प्रमोशन
कन्या- यश 
तूळ - प्रतिष्ठा प्राप्ती
वृश्चिक- भीती
धनु- सन्मान
मकर- कामे पूर्ण होतील
कुंभ- कार्य सिद्धी 
मीन- हानी

बातम्या आणखी आहेत...