Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Horoscope Of September 2018 in marathi

सप्टेंबरमध्ये 3 ग्रहांमुळे 6 राशींना होऊ शकतो धनलाभ, इतर राशीच्या लोकांनी राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 03:29 PM IST

या महिन्याच्या सुरुवातील शुक्र आणि बुध राशी परिवर्तन करून तूळ आणि सिंह राशीत प्रवेश करतील.

 • Horoscope Of September 2018 in marathi

  या महिन्याच्या सुरुवातील शुक्र आणि बुध राशी परिवर्तन करून तूळ आणि सिंह राशीत प्रवेश करतील. बुध राशी परिवर्तनामुळे बुधादित्य योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने 6 राशीच्या लोकांना प्रगती आणि धन लाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त गुरुसोबत शुक्र ग्रह असल्यामुळे सहा राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. यानंतर 6 सप्टेंबरला शनी मार्गी होत असल्यामुळे काही लोक कोर्ट प्रकरणात अडकू शकतात, कर्ज वाढू शकते आणि वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. येथे जाणून घ्या, सप्टेंबरचा महिना कसा राहील तुमच्या राशीसाठी...


  मेष
  शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर थोडे सावध राहावे. अन्यथा लाभाऐवजी नुकसान होण्याची शक्यता. स्वप्रयत्नांनी तुमचा व्यवसाय अधिक व्यापक करण्यास समर्थ असाल. जमीन, मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर थोडा काळ थांबावे. त्यामुळे लाभ संभवतो.


  वृषभ
  व्यावसायिक स्तरावर सल्ला ऐकण्यासाठी तुमच्या विचारांमध्ये खुलेपणा येईल. परिस्थिती जोखण्याची तुमची क्षमता आर्थिक व्यवहारांत निर्णय घेण्यासाठी सहायक ठरेल. जुन्या मित्रांशी भेटीगाठी होतील. त्यांच्याविषयी जाणण्याची संधी मिळेल. तुमचे सर्वांगीण ज्ञान रचनात्मकता प्रत्यक्षात आणण्यास मदत करेल


  मिथुन
  व्यवसायासाठी अति प्रभावशाली कल्पना असतील. तुम्हाला त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या नव्या उद्योगाला गुंतवणूकदारांकडून आर्थिक प्रस्ताव मिळेल. मात्र असे प्रस्ताव न स्वीकारणे योग्य ठरेल. स्वतंत्रपणे काम करणे तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे.


  कर्क
  उच्च शिक्षण घेत असलेल्यांना यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. स्वविवेकाने घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम देणारे सिद्ध होतील. एखादे कठीण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळेल. तल्लीनतेने कामात व्यग्र राहाल. त्याचे परिणाम आनंददायी असतील.

 • Horoscope Of September 2018 in marathi

  सिंह 
  आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही ज्या योजना आतापर्यंत तयार केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याआधी त्या तुमच्यासाठी किती फायदेशीर किंवा नुकसानकारक ठरू शकतात याची पडताळणी आधी अवश्य करा. तसेच सर्वांचे ऐकायचे आणि आपल्या मनाप्रमाणेच करायचे हे लक्षात ठेवा. 


  कन्या
  स्वत:च्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही ज्या याेजना बनवल्या हाेत्या, त्यांच्यावर काम करण्याची वेळ अाली अाहे. कार्यक्षेत्रात मित्र व सहकाऱ्यांकडून मदत मिळत राहील. तसेच ज्या पदाेन्नतीची दीर्घकाळापासून प्रतीक्षा हाेती तीदेखील हाेऊ शकते. तुमची अपूर्ण कामे पूर्ण हाेतील; परंतु निर्णय घेताना खूप काळजी घ्या.

 • Horoscope Of September 2018 in marathi

  तूळ 
  वाद-विवादांपासून स्वत:ला दूर ठेवा; अन्यथा अशा संकटात सापडाल, ज्यातून बाहेर निघणे खूपच कठीण हाेईल. सध्या जवळच्यांचे सहकार्य मिळतच राहील. त्यामुळे स्वत:ला एकटेपणाची जाणीव हाेणार नाही. इतरांचा फायदा करूनही तुमच्यावर वाईटपणाचा शिक्का बसू शकताे. 


  वृश्चिक
  तुम्हाला समाजातील प्रतिष्ठित आणि उच्चपदस्थ लोकांसोबत उठण्या-बसण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्ही जीवनाशी संबंधित काही नव्या गोष्टी शिकू शकाल. जर तुम्ही त्या गोष्टी जीवनात अमलात आणल्या तर उद्दिष्टप्राप्तीपासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही..

 • Horoscope Of September 2018 in marathi

  धनु
  ज्या बढतीची दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती ती तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुमच्या वेतनातही वाढ होईल. कामांच्या व्यग्रतेचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ देऊ नका. शरीर जेवढे सहन करू शकते तेवढेच काम करा. जी कामे सामान्यत: कठीण दिसू शकतात ती तुम्ही तुमच्या बुद्धीने यशस्वी करू शकता. 


  मकर 
  स्वप्रयत्नांनी तुम्ही तुमची अपूर्ण कामे पूर्ण करू शकाल. तुमचे अधिकारी तुमच्यातील दडलेली प्रतिभा ओळखून तुम्हाला त्यानुसार प्रतिष्ठित पद देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या कारकीर्दीत नवा टप्पा गाठाल. व्यवसायात लाभाची स्थिती निर्माण होत आहे. अडकलेला पैसाही लवकरच मिळेल.  

 • Horoscope Of September 2018 in marathi

  कुंभ 
  जे लोक नोकरीच्या संधीत सुधारणा होण्याच्या शोधात आहेत ते मित्रांकडून मदतीची आशा करू शकतात. आर्थिक स्तरावर एखाद्या वित्त संस्थेकडून कर्जाच्या रूपात पैसा घ्यावा लागू शकतो. स्थायी घरात जाल. जीवनसाथीची प्रकृती खराब झाल्याने मोठ्या मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. 


  मीन
  सध्या जेवढ्या जास्त लोकांशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवाल तेवढा जास्त फायदा तुम्हाला पुढे होईल. विरोधकांचे मनोबल कमी असेल. लोकही मनापासून तुमच्या सोबत येण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही तुमचे काम आणि प्रतिभा यांच्या बळावर आपल्या प्रभाव क्षेत्रात पुढे जाण्यात पूर्ण यशस्वी व्हाल. 

Trending