आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 28 जानेवारी रोजी दिवसाची सुरुवात शततारका नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून परीघ नावाचा योग जुळून येत आहे. आजच्या दिवशी 5 राशीच्या लोकांना काहीशा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तर उर्वरीत 7 जणांसाठी दिवस विशेष फळ देणारा ठरू शकतो. आजच्या दिवशी अतिरिक्त इनकम देखील होण्याचे योग आहेत.

तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. एखादी क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घ्याल. मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.
  • वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ४ हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क ला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. अती काबाड कष्ट तब्येत बिघडण्यास कारणीभूत होतील. सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात असूद्या.
  • मिथुन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ९ राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. व्यवसायाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. विवाहेच्छूकांचे एखाद्या समारंभात सूत जुळू शकेल.
  • कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : १ अधिकारी वर्गाकडून त्रास संभवतो. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. मित्रांच्या फार नादी लागूच नका.
  • सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८ नोकरीच्या ठीकाणी आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. घरात थोर मंडळीही आपल्याच मतावर अडून बसतील. आज एकांत हवासा वाटेल.
  • कन्या : शुभ रंग : भगवा| अंक : ७ उद्योग व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरीत साहेबांचे समाधान होणे केवळ अशक्य. आज जोडीदारही माझेच खरे म्हणेल. संयमाची गरज आहे.
  • तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ३ तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाने समोरच्या व्यक्तीस प्रभावित कराल. तुमच्यातील नेतृत्वगुणांस वाव मिळेल.जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.
  • वृश्चिक : शुभ रंग : अबोली| अंक : १ आजचा दिवस फक्त कर्म करण्याचा. फळ उशिराने का होईना मिळणारच आहे. हितशत्रू सक्रिय असताना भावी उपक्रम आत्ताच उघड करू नका. तंदुरुस्ती महत्वाची.
  • धनू : शुभ रंग : पिवळा| अंक : ५ सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, मुलांची खेळणी वगैरे व्यवसाय तेजीत चालतील. कलाक्रिडा क्षेत्रातल्या मंडळींना उत्तम संधी मिळतील. हौसमौज कराल.
  • मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : २ आज तुमचे मनोबल चांगले असेल. आत्मविश्वास वाढवणाऱी घटना घडेल. मुलांची शिक्षणातील प्रगती कौतुकास्पद राहील. कलाकारांनी प्रयत्न वाढवावेत.
  • कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६ महत्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. हाती असलेले पैसे जपून वापरा. आनंदाच्या भरात कुणाला वचने देऊ नका.
  • मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ४ मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दूरावलेले नातलग जवळ येतील. आज पैसा पुरेसा असल्याने मनासारखा खर्च करता येतील. आज आनंदी दिवस.