आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा बुधवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी दिवसाची सुरुवात अनुराधा नक्षत्रामध्ये होत आहे. आजच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्राच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी संमिश्र स्वरुपाचा ठरेल. आपल्या राशीनुसार जाणून घ्या, कसा राहील आजचा दिवस... मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ६ मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळयात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे. वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ४ अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. आज महत्वाच्या कामासाठी भटकंती होईल. मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३ अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस. कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ५ आज तुम्हाला संयमाची गरज असून अती उत्साहाच्या घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. मुलांनी आज्ञेत रहावे. सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ७ आज काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार करा. गृहीणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवलेली बरी. कन्या : शुभ रंग : हिरवा| अंक : ९ एखाद्या नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू अाहे. अपूरी स्वप्ने साकार होतील. तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : २ उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील. वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५ कर्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरीष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.विरोधकांशी गाेड बोलूनच वेळ मारून न्यावी लागेल. धनू : शुभ रंग : अबोली| अंक : ८ आज काही क्षुल्लक कारणाने घरातील थोरांशी मतभेद संभवतात. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत व्यवहार नकोत. मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : १ आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल. पत्नीस दिलेली वचने पाळाल. कुंभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५ उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काबाड कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमधे आज काही वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे. मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : ३ उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

बातम्या आणखी आहेत...