आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रॉपर्टीसाठी पतीने केली पत्नीची हत्या, अडकल्या जाण्याच्या भीतीने रचले होते मोठे षडयंत्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हिल्सडेल : अमेरिकेमधील एका माजी स्टॉक ब्रोकरवर पत्नीची हत्या केल्याचा खटला सुरु आहे. पैशांसाठी आपल्या कोट्यधीश पत्नीचा खून केला आणि आपल्या नऊ वर्षाच्या मुलीला यामध्ये अडकिण्याचा प्रयत्न केला असल्याचा त्याच्यावर आरोप केलेला आहे. पण त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. 

 

बाथटबमध्ये पडलेला होता महिलेचा मृतदेह

- 2009 मध्ये शीले डेनिशेफस्की कोवलिन (47) या महिलेचा मृतदेह न्यूयॉर्क येथील घरात आढळून आला होता. शीले आणि तिचा पती रोड यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू होता. शीले रोडला आपल्या 28 कोटी रूपयांच्या प्रॉपर्टीमधून काढू पाहत होती. 

- घटनेवेळी त्यांची दोन्ही मुले एना आणि माइल्स घरातच झोपले होते. सकाळी उठून बाथरूममध्ये गेल्यावर त्यांना आईचा मृतदेह दिसला. महिलेच्या डोक्यावर जखम झाल्यानंतरही तिच्या कुटुंबीयांनी पोस्टमार्टम होऊ दिले ऩाही. 

- नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार शीलेने मृत्यूच्या एक दिवस अगोदर वकीलपत्र तयार करण्याचे ठरविले होते. सोबतच आपली हत्या होणार असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांना तपासणीदरम्यान शीलेच्या मृत्यूबाबत संशय आल्याने 2010 मध्ये कब्रस्तानातून तिचा मृतदेह काढून त्याची तपासणी करण्यात आली होती. गळा आवळून तिचा खून करण्यात आल्याचे तपासणी दरम्यान समोर आले होते. 

 

अडकल्या जाण्याच्या भीतीने रचले मोठे षडयंत्र

- 2013 मध्ये रोडला आपण अडकणार असल्याची भीती वाटली तेव्हा त्याने आपल्या मुलीच्या नावाने आयपॅडवर शीलेची हत्या केल्याची कबुली दिल्याचे खोटे पत्र लिहिले असल्याचे खटल्याची सुनावणी सुरु असताना सांगितले. 

- घटनेच्या अनेक वर्षानंतर पोलिस याला एक अपघात समजत होते. घटनेच्या सहा महिन्यांनंतर 2015 मध्ये रोडच्या प्रेयसीने त्याचे बोलणे रेकॉर्ड केले. त्यात त्याने सांगितले होते की, तो त्याची मुलगी एनाचे लग्न करणार आहे. यामुळे आरोपीला संपत्तीचा अधिकार प्राप्त होईल. यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आला.  

- आयपॅडवरील नोटमध्ये त्याने एनाचे नाव सांगत लिहिले होते की, ती तिच्या आईच्या अवैध संबंध आणि डेटिंगमुळे खूपच क्रोधीत झाली होती. पण रोडची ही योजना यशस्वी झाली नाही आणि तो पकडला गेला. 

- शीलेच्या मृत्यूनंतर कोणालाच अटक करण्यात आली नाही. पण 2017 मध्ये रोडवरील संशय वाढत गेल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...