Home | Khabrein Jara Hat Ke | Horrific note 'penned by dad to frame own daughter for murder of wealthy wife

बाथटबमध्ये पडलेला होता कोट्याधिश महिलेचा मृतदेह, महिलेच्या डोक्यावर होत्या जखमेच्या खुना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 02:36 PM IST

पोलिसांना मिळालेल्या एका पत्रात मुलीने कबूल केला होता गुन्हा, नंतर बदलली पुर्ण कहानी

 • Horrific note 'penned by dad to frame own daughter for murder of wealthy wife

  हिल्सडेल. अमेरिकामध्ये राहणा-या एका माजी स्टॉक ब्रोकरवर बायकोच्या हत्येची केस सुरु आहे. या व्यक्तीवर त्याने पैशांच्या लालसेपोटी कोट्याधिश पत्नीचा मर्डर केला, नंतर त्याला वाटले की, तो अडकतोय, तेव्हा त्याने या प्रकरणात आपल्या नऊ वर्षांच्या मुलीला अडकवण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पण त्याचे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही.

  बाथटबमध्ये पडलेली होती महिलेची बॉडी

  - हिल्सडेल शहरात राहणा-या शीले डेनिशेफस्की कोवलिन (47) ची डेडबॉडी जानेवारी 2009 मध्ये तिच्या न्यूयॉर्क येथील घरात मिळाली. शीलेचा मृत्यू झाला, तेव्हा तिची हसबंड रोड कोवलिन(36) सोबत घटस्फोटाची केस सुरु होती. तिला रोड याला आपल्या 28 कोटींच्या प्रॉपर्टीमधून बेदखल करायचे होते.
  - या घटनेप्रसंगी तिचे दोन मुलं एना आणि माइल्स घरातच होते आणि ते झोपलेले होते. सकाळी उठून ते बाथरुममध्ये गेले तेव्हा मुलांना बाथटबमध्ये आईची डेडबॉडी दिसली. महिलेच्या डोक्यावर जखमा दिसल्या. पण तरीही यहूदी मान्यतेमुळे महिलेच्या कुटूंबियांनी तिचे

  पोस्टमॉर्टम होऊ दिले नाही.
  - नातेवाईकांनुसार मृत्यूच्या एका दिवस पहिलेच शीले आपल्या मृत्यूपत्राविषयी बोलली होती, यासोबतच तिने आपल्या हत्येची शक्यता वर्तवली होती. पोलिसांनी तपासणी केल्यानंतर पोलिसांचा संशय वाढला. यानंतर 2010 मध्ये तिची डेडबॉडी कबरीमधून काढण्यात आली. यामध्ये समजले की, तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला होता.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...

 • Horrific note 'penned by dad to frame own daughter for murder of wealthy wife

  अडकण्याच्या भितीने रचला मोठा डाव 


  - केसच्या सुनावणीदरम्यान कोर्टात सांगण्यात आले की, 2013 मध्ये रोडला तो अडकणार असल्याचा अंदाज आला. तेव्हा त्याने आपली मुलगी एनाच्या नावाने आयपॅडच्या माध्यमातून बनावट लेटर लिहिले, यामध्ये तिने शीलेची हत्या केल्याचे मान्य केले. 
  - या घटनेच्या अनेक वर्षांनंतर पोलिस याला अपघात मानत होते. पण 2015 मध्ये रोडच्या गर्लफ्रेंडने सीक्रेट पध्दतीने त्याची बातचित रिकॉर्ड केली. त्यानंतर पोलिसांचा संशय वाढला. यामध्ये तो म्हणत होता की, तो मुलगी एनाचे लग्न लावून देईल, यामुळे प्रॉपर्टीवर आरोपीचा कंट्रोल असेल. 
  - तर या नोटमध्ये त्याने एना बनून लिहिले होते की, तिने आईची हत्या केली कारण ती आईच्या अफेअर आणि डेटिंगच्या सवयीवर खुप रागावलेली होती. पण त्याची ही चाल यशस्वी ठरली नाही आणि तो पकडला गेला. 
  - शीलेच्या मृत्यूनंतर कुणालाही अटक झाली नव्हती. पण 2017 मध्ये पतीवरील संशय वाढला. यानंतर रोडला अटक करण्यात आली. कारण तो आपल्या मुलांच्या प्रॉपर्टीवर वेगवेगळ्या पध्दतींनी कब्जा करण्याचा प्रयत्न करत होता. 
   

 • Horrific note 'penned by dad to frame own daughter for murder of wealthy wife

Trending