आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन घरात शिफ्ट झाली होती तरुणी, घरामागील गार्डनमध्ये बघितले असे काही की फुटला चांगलाच घाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही कहाणी 'सोशल व्हायरल सीरीज'अंतर्गत आहे. जगभरात सोशल मीडियावर अशा अनेक स्टोरीज व्हायरल होत असतात, ज्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत.)

 

एबे हल्टनः इंग्लंडमध्ये एक महिला तिच्या घरामागे असलेल्या गार्डनमधील साफसफाई करत असताना अचानक खूप घाबरली. गार्डनमध्ये खूप घाण साचली होती,. म्हणून ती ते स्वच्छ करत होती. त्याचवेळी तिला तिथे एक मोठी पॉलिथिन बॅग आढळली. जेव्हा तरुणीने ती उघडली तेव्हा त्यात डुक्कराचे मेलेले पिल्ले होती. तिला त्या बॅगेत डुक्करांची तब्बल 28 मृत पिल्ले आढळली. 

 

तरुणीने केली होती तक्रार.. 

- ही स्टोरी इंग्लंडच्या स्टेफोर्डशायरच्या एबे हल्टनमध्ये राहणा-या टिफनी सेनाराची आहे. 22 वर्षीय टिफनी काही दिवसांपूर्वीच तिचा पती आणि दोन मुलांसोबत नवीन घरी शिफ्ट झाली होती.

 

- नवीन घरी आल्यानंतर घराच्या मागे असलेल्या गार्डनमध्ये खूप घाण साचली असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने अनेकदा संबंधित लोकांकडे याविषयीची तक्रार नोंदवली. पण कुणीही तिच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही.

 

- टिफनीने सांगितल्यानुसार, गार्डनमध्ये फुटलेले ग्लास, कचरा आणि अनेक दगडं होती. अनेकदा तक्रार करुनही त्यावर अॅक्शन घेण्यात आली नाही. म्हणून तिने स्वतःच गार्डन स्वच्छ करण्याचे ठरवले.

 

आढळली मृत डुक्कराची पिल्ले 
- टिफनीने सांगितले, 'अलीकडेच जेव्हा मी गार्डनच्या साफसफाईसाठी तिथे पोहोचली. तिथे मला एक ओबडथोबड जागा दिसली. ती स्वच्छ करण्यासाठी मी त्यावरील माती आणि कचरा बाजुला केला असता, मला तिथे एक छोटी कब्र दिसली. मी तिथे खोदकाम केले.'

 

- 'थोडे खोदल्यानंतर मला तिथे एक मोठी पॉलिथिन बॅग आढळली. ती बाहेर काढली असता अतिशय दुर्गंधी पसरली. जेव्हा मी ती उघडून पाहिली, तेव्हा त्यात मला डुक्करांची 28 मृत पिल्ले आढळली. ते बघून मी अतिशय घाबरले आणि तेथू पळून काढत माझ्या घरी आली.'

 

- टिफनीने याची माहिती तिच्या सोसायटीतील लोकांव्यतिरिक्त प्राण्यांसाठी काम करणा-या संस्थेला दिली. तेव्हा तिला समजले की, याच ठिकाणी यापूर्वी डुक्करांची 42 मृत पिल्ले आढळली होती. ती नेमकी कुणी येथे आणून टाकली, याविषयी काहीच थांगपत्ता लागला नाही. 

बातम्या आणखी आहेत...