आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्वेंसिया : ब्रिटनमध्ये राहणारी आर्मीची एक पूर्व कॅडेट आपल्या मुलाला कुशीत घेऊ शकत नाही. ती इतकी कमकुवत आहे की, स्वतःच्या हाताने आंघोळ सुद्धा करू शकत नाही. तिची ही अवस्था हर्नियाच्या आजारामुळे झाली आहे. यामुळे एकेकाळी तिचे पोट खूपच फुगले होते. उपचार करण्यास उशीर झाल्यामुळे जवळपास अडीच किलोची गाठ शरीराच्या बाहेर लटकत होती. या रोगामुळे महिलेला पॉटी (संडास) च्या उलट्या होत होत्या. अखेर ऑपरेशनद्वारे तिचा हर्निया काढण्यात आला पण तिच्या प्रकृतीत अजूनही सुधार झाला नाही.
उल्टीसोबत बाहेर येत होती पॉटी
> स्वेंसिया शहरात राहणाऱ्या तान्या इवान्स (28) या महिलेची ही कथा आहे. 2014 मध्ये तिला या आजाराची सुरुवात झाली होती. आतड्यांमध्ये अडथळा आल्यानंतर तिला रूग्णालयात जावे लागले होते. तिची तब्येत इतकी बिघडली होती की, तिचे शरीर पिवळे पडले आणि उल्टीसोबत तिची पॉटी पण बाहेर पडत होता.
> तान्याने सांगितले की, एक दिवस उल्टीसोबत तिच्या पोटातील विचित्र दुर्गंधी असलेली काळी गोष्ट बाहेर पडली होती. त्याची तपासणी केली असता तो पॉटीचा तुकडा तोंडावाटे बाहेर आला असल्याचे मेडिक्सन सांगितले. हे समजल्यावर मी खूपच घाबरले होते.
> यानंतर डॉक्टरांनी एका विशेष शस्त्रक्रियेद्वारे छोटे आतडे काढून टाकले. यामुळे प्राकृतिक पद्धतीने शौचालयास जाण्यास अवघड झाले होते. सर्जरीनंतर डॉक्टरांनी तिच्या पोटाच्या बाहेर एक पिशवी लावली होती. यामध्येच तिच्या शरीरातील घाण जमा होत होती.
> नंतरच्या काही दिवसांपर्यंत तिली प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली होती. तिला वाटले की, ती आता लवकरच पूर्णपणे ठणठणीत होईल. पण काही महिन्यांनंतर तीला हर्निया झाला आणि शरीराच्या खालच्या भागातून रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाली होती.
पोटाच्या बाहेर लटकत होती अडीच किलोची हर्नियाची गाठ
> डॉक्टरांनी ऑपरेशनद्वारे हर्नियाची गाठ काढण्यास सांगितले पण यामुळे तिची आई होण्याची शक्यता कमी झाली असती. यानंतर तान्या आणि तिच्या पतीने मुलगा झाल्यानंतर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.
> 22 ऑक्टोबर 2016 रोजी या जोडप्याच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला. पण यानंतरही ऑपरेशनसाठी तान्याला भरपूर वाट पाहावी लागली होती. यादरम्यान हर्नियाचा आकार वाढत गेला आणि तो अडीच किलोचा झाला.
> दीर्घ काळापर्यंत हा त्रास सहन केल्यानंतर एप्रिल 2018 मध्ये ऑपरेशनद्वारे तिची आतडी काढण्यात आली. सोबतच तिचा मलाशय आणि गुदा देखील काढण्यात आला. पण ऑपरेशन झाल्यानंतर ती आजही अनेक समस्यांनी त्रस्त आहे.
शस्त्रक्रियेनंतरही आहेत बऱ्याच अडचणी
> तान्याचे म्हणणे आहे की, भलेही माझी सर्जरी झाली. तरी रोजचे काम करताना मला खूप त्रास सहन करावा लागत आहे. मी स्वतः अंघोळ करू शकत नाही. माझे पती मला अंघोळ घालतात.
> तान्या थोडेफार देखील जड सामान उचलू शकत नाही. यामुळे ती आपल्या मुलीला उचलून घेऊन तिच्यासोबत खेळू शकत नाही. यामुळे ती खूप दुःखी आहे.
> सर्जरीनंतर तिचे वजन खूपच कमी झाले असून ती खूप हडकूळी झाली आहे. ऑपरेशननंतर माझ्या शरीरावरील निशाण पाहून आजही तिली खूप त्रास होत असल्यचे तिचे म्हणणे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.