आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धड हवेत अन् 130 फूट उंच झोक्यात अडकले चिमुकल्याचे मुंडके, समोर आला धक्कादायक video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या तायजो शहरातील एका पार्कचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक 5 वर्षांचा मुलगा आकाशपाळण्यात खेळताना अचानक घसरला. झोक्याच्या कॅबिनमधून निसटल्यानंतर त्याचे शरीर बाहेर आले. परंतु, मुंडके तसेच खिडकीत अडकले. खाली थांबलेल्या लोकांचे हे दृश्य पाहून ओरडून-ओरडून हाल झाले. हा मुलगा अम्युझमेंट पार्कमध्ये आपल्या आईबरोबर गेला होता. तसेच एकटाच आकाश पाळण्यात चढण्याचा हट्ट धरला. पार्कने यासाठी परवानगी नाकारली. पण, आईने दोन तिकीट घेतल्यानंतर त्याला बसवण्यात आले. 


बाहेर वाकून पाहत होता मुलगा...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मुलगा झोक्याच्या कॅबिनमधून बाहेर डोकावून पाहत होता. कॅबिन टॉपवर पोहोचताच त्याने पुन्हा डोकावून खाली पाहिले. यात अचानक त्याचा तोल गेला आणि मागून शरीर बाहेर निघाला. परंतु, आपल्याच शरीराच्या वजनाने त्याचे डोके अडकले. हे दृश्य पाहून आई आणि स्थानिकांनी ओरडा-ओरड सुरू केली. तो सुद्धा लटकल्याने किंकाळत होता. अशा प्रकारचे चित्र पाहून तेथे पाहाणाऱ्या प्रत्येकाचे हृदय पिळवटले. काहींनी तर तो मुलगा खाली पडला असता तर यापेक्षा बरे झाले असते असे म्हटले. 


मग झाला चमत्कार
छोटेसे जीव असे तळपत असतानाचे पाहून सगळेच घाबरले होते. त्याचवेळी अचानक घडले ते चमत्कारच. झोकेवाला आणि लोकांनी झपाट्याने झोके खाली ओढले. तसेच कॅबिन खाली आल्यानंतर मुलाला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तो अजुनही श्वास घेत होता. त्याला गळ्यावर जखमा झाल्या. परंतु, त्याचा जीव वाचला. 

 

बातम्या आणखी आहेत...