आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच्या पतीचे डॉक्टरने केले 500 तुकडे, सासऱ्याने डॉक्टरच्या घरी जाऊन गोंधळ घातला नसता तर अॅसिडमध्ये विरघळवून मृतदेहाची नाल्यात विल्हेवाट लावली असती डॉक्टरने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशंगाबाद (एमपी) - आपल्या अवैध संबंधांचा बोभाटा झाल्याच्या भीतीने इटारसीच्या सरकारी अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. सुनील मंत्री (55) याने 2 दिवसांपूर्वीच कामावर ठेवलेल्या ड्रायव्हर वीरेंद्र पचौरी (30) यांची होशंगाबादेतील आपल्या राहत्या घरात हत्या केली. दातदुखीवर उपचारांच्या बहाण्याने सोमवारी संध्याकाळी उशिरा घरात ड्रायव्हरला त्याने बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. मग करवतीने गळा कापला. धडाचे तुकडे-तुकडे करून घरातीलच ड्रम व बादल्यांत सल्फ्यूरिक अॅसिडमध्ये विरघळण्यासाठी टाकून ठेवले. आरोपी डॉक्टरच्या पत्नीचे निधन झालेले आहे. तो एकटाच राहतो. त्याचा मुलगा मुंबई आणि मुलगी इंदुरात राहते. ड्रायव्हरला त्याच्या पत्नीचे (वय 28) डॉक्टरशी अवैध लैंगिक संबंध असल्याची माहिती होती. यावरून तो डॉक्टरला ब्लॅकमेल करत होता.

 

एसपी अरविंद सक्सेना म्हणाले की, ड्रायव्हर रात्रभर घरी न परतल्याने त्याचे वडील त्याचा शोध घेण्यासाठी मंगळवारी दुपारी डॉक्टरच्या घरी पोहोचले आणि मुलगा बेपत्ता असण्यावरून डॉक्टरला जाब विचारला. त्यांची आरडाओरड ऐकून राउंडवर बाहेर निघालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने गाडी थांबवून चौकशी केली. तेव्हा ड्रायव्हरच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता असल्याची माहिती दिली. यावर अधिकाऱ्यांच्या टीमने डॉक्टरच्या घरात शोध घेण्यासाठी प्रवेश केला तेव्हा डॉक्टर पुरता हादरून गेला.  त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते, बाथरूमच्या फरशीवर व अॅसिडने भरलेल्या ड्रममध्ये मृतदेहाचे तुकडे आणि चार करवती आढळल्या. अधिक चौकशी केली असता डॉक्टरने ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त होऊन ड्रायव्हरची हत्या केल्याचे कबूल केले. त्याचा प्लॅन मृतदेहाचे तुकडे व हाडे अॅसिडमध्ये विरघळवून नाल्यात विल्हेवाट लावण्याचा होता. यानंतर तो स्वत:च पोलिसांत जाऊन ड्रायव्हर हरवल्याची तक्रार देण्यासाठी जाणार होता. आरोपी डॉक्टर कस्टडीत आहे. मृत ड्रायव्हरच्या पत्नीचीही चौकशी केली जात अहो. हत्येत ड्रायव्हरच्या पत्नीच्या भूमिकेबाबत काहीही बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.


मृत ड्रायव्हरची पत्नी म्हणाली- मला काहीच माहिती नाही...
मृत ड्रायव्हरची पत्नीने म्हटले की, या घटनेबद्दल तिला काहीही माहिती नाही. माझे पती ड्रायव्हर होते, अनेक जागांवर त्यांनी काम केलेले आहे. डॉक्टरशी त्यांचे काय बोलणे झाले होते, याची माहिती नाही. 

 

आरोपी म्हणाला: काहीही बोलणार नाही, बस्स मारून टाकलं...
ताब्यात असलेल्या आरोपीने म्हटले की, मला काहीही बोलायचे नाही, बस्स, मी त्याला मारून टाकले. कोर्टात माझा वकीलच बोलेल.


आधीच खरेदी करून आणल्या होत्या करवती अन् अॅसिड...
नर्मदापुरम रेंजचे आयजी के. सी. जैन व होशंगाबादचे एसपी अरविंद सक्सेना म्हणाले की, आरोपी डॉक्टर सुनील मंत्रीने 3 फेब्रुवारी रोजी वीरेंद्र ऊर्फ वीरू पचौरी याला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवले होते. परंतु त्याच्या हत्येचा कट त्याने आधीपासूनच रचला होता. त्याने अॅसिड आणि करवतींची खरेदी करून ठेवलेली होती. सोमवारी संध्याकाळी दातदुखीवर उपचार करण्याच्या बहाण्याने बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्याने हत्या केली.

 

हत्येनंतरही ड्यूटीवर होता डॉक्टर 
4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी हत्येनंतर 5 फेब्रुवारी रोजी डॉक्टर सुनील मंत्री इटारसीच्या सरकारी रुग्णालयात सकाळी 8 वाजता ड्यूटीवर पोहोचला होता. तथापि, नंतर 10 वाजता सहकारी डॉक्टरला सांगून अचानक होशंगाबादेतील घरी परतला. तो म्हणाला की, मला एक काम आहे, एखादे पोस्टमार्टम आले तर पाहून घे. 5 फेब्रुवारी रोजी इटारसी रुग्णालयात पोस्टमार्टम करण्याची जबाबदारी डॉक्टर मंत्रीची होती.


आरोपी डॉक्टरच्या पत्नीशी परिचित होती मृत वीरूची पत्नी 
पोलिसांच्या मते, डॉ. मंत्रीच्या पत्नीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. त्यापूर्वी 4 वर्षांपर्यंत सुनीलची पत्नी सुषमा आणि वीरूच्या पत्नीने एकत्र बुटीकचे काम केले होते. वीरूच्या पत्नीचे डॉक्टरच्या घरी येणे-जाणे होते. तेव्हापासूनच दोघांमध्ये ओळख होती. जी नंतर अवैध लैंगिक संबंधांमध्ये बदलली. वीरूच्या पत्नीशीही चौकशी केली जात आहे.

 

ड्रायव्हरच्या पत्नीशी होते डॉक्टरचे शारीरिक संबंध, पती करायचा ब्लॅकमेल 
अवैध संबंधांची माहिती मिळाल्यावर एका वर्षापासून महिलेचा पती ब्लॅकमेलिंग करत होता. यामुळे डॉक्टर त्रस्त होता. बदनामीच्या भीतीने त्याने हत्या करण्याचा ठरवले. यासाठी त्याने सल्फ्यूरिक अॅसिडच्या एक-एक लिटरच्या बॉटल खरेदी करून अनेक दिवसांपासून घरात आणत होता. सोबतच त्याने चार करवतीही खरेदी करून ठेवल्या होत्या. म्हणजेच त्याने ठरवलेले होते की, संधी मिळताच ड्रायव्हरची हत्या करून त्याची हाडे विरघळवून विल्हेवाट लावायची. जवळीकता वाढवण्यासाठी त्याने महिलेच्या  पतीला 16 हजार रुपये मासिक पगारावर ड्रायव्हरची नोकरी देऊ केली. यावर ड्रायव्हर तयार झाला. 4 फेब्रुवारी रोजी कामावर पोहोचलेल्या ड्रायव्हरने दातदुखीचा त्रास सांगितला, तेव्हा डॉक्टरने वेळ न दवडता त्याला म्हटले की, ही एक गोळी आणि एक इंजेक्शन घेतल्यावर सगळे ठीक होईल. यानंतर त्याने गुंगीचे इंजेक्शन दिले आणि घरातील करवतीने त्याचा गळा कापून शिर धडावेगळे केले. यानंतर धड फरपटत पहिल्या मजल्यावर नेले आणि तेथे बाथरूममध्ये त्याचे छोटे-छोटे तुकडे केले. बॉटलमधील अॅसिड एका मोठ्या ड्रममध्ये ठेवले, त्यात मृतदेहाचे तुकडे विरघळण्यासाठी ठेवून दिले.


परंतु आपला मुलगा बेपत्ता झाला म्हणून ड्रायव्हरचा बाप शोध घेत डॉक्टरच्या घरी आला आणि तेथे मोठा गोंधळ घातला म्हणून ही हत्या उघडकीस आली. अन्यथा डॉक्टरने मृतदेहाची विल्हेवाट लावली असती आणि ड्रायव्हर बेपत्ता झाल्याचे गूढ उकलले नसते. 

 

बातम्या आणखी आहेत...