आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hoshiarpur Minor Girl Given Drugs By Uncle And Reped With His Friends Multiple Times, Police Registered Complaint Under Pocso

पुतणीला ड्रग्जचे व्यसन लावून सख्खा काका करू लागला रेप, व्हिडिओ बनवून मित्रांशीही संबंध ठेवायला केले मजबूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशियारपूर - येथे एका सख्ख्या काकाने आपल्या 17 वर्षीय पुतणीला आधी ड्रग्जचे व्यसन लावले आणि मग रेप करू लागला. त्याचा पाशवीपणा येथे थांबला नाही. त्याने बलात्काराचा व्हिडिओ बनवला आणि पीडितेला ब्लॅकमेल करून सारखे तिचे शोषण करू लागला. नंतरत या नराधम काकाने पुतणीला आपल्या मित्रांसमोर ही फेकले. या नरकातून सुटका होण्यासाठी पीडितेने कसाबसा तो व्हिडिओ मिळवला आणि होशियारपूरच्या एसएसपींना सोपवला. 22 ऑक्टोबरला 2018 रोजी तिने याबाबत लेखी तक्रारही दिली. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला आणि एका महिन्यानंतर आरोपी काका राकेश कुमारसह 3 जणांविरुद्ध पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या, पीडितेवर उपचार सुरू आहेत.

 

पीडितेची आपबीती, काकाच्या पाशवी कृत्यांची कहाणी

 

माझे डोके दुखत होते, काकाने औषधाच्या जागी ड्रग्ज खाऊ घातली...
होशियारपूरच्या महिला पोलिस अधिकारी संदीप कौर यांना लेखी तक्रारीत 17 वर्षीय पीडितेने सांगितले की, 2 वर्षांपूर्वी 2016 मध्ये मला डोकेदुखीचा त्रास झाला होता. याबद्दल मी काका राकेश कुमारला सांगितले. काकाने औषध म्हणून मला नाकात हेराईनचे पाणी टाकले. यानंतर मला जेव्हाही डोकेदुखी व्हायची काका ड्रग्ज द्यायचा. मी काकावर विश्वास ठेवून ते अज्ञात औषध खात होते. परंतु हळूहळू ही माझी कमजोरी बनली. मग काकाने याचा फायदा घेणे सुरू केले. मग जेव्हाही मला थकवा किंवा कमजोरी जाणवायची काका मला ते नशेचे औषध द्यायचा. मला म्हणायचा की, हे घेतल्यावर तू ठीक होशील. मग मला याचे व्यसनच लागले. मला जेव्हाही तलब लागायची काका मला त्याबदल्यात शारीरिक संबंधांसाठी मजबूर करायचा. यादरम्यान काकाने माझा व्हिडिओही बनवला. 

 

एवढेच नाही, त्याने त्याचे मित्र शुभम उर्फ मरिकी आणि कवल यांच्याशी शारीरिक संबंधांसाठी ब्लॅकमेल केले. हे तिघेही माझ्यावर रेप करायचे आणि हिरोइनचा डोस द्यायचे. मी कसाबसा हा व्हिडिओ मिळवला आणि होशियारपूरच्या एसएसपींना सोपवला. 

 

तिघांना लवकरच अटक करू...
या प्रकरणाचा तपास एसएसपी आणि एसपी (सिटी) यांनी केला. रिपोर्टमध्ये काका राकेश कुमार, त्याचा भाऊ शुभम ऊर्फ मरिकी यांच्यासह कंवल हे आरोपी आढळले आहेत. तिघांविरुद्ध आयपीसी कलम 376 आणि पॉक्सो अॅक्ट-04 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. 
- राजेश अरोडा, सिटी पोलिस स्टेशन इंचार्ज, होशियारपूर.

 

 

बातम्या आणखी आहेत...