आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
होशियारपूर - सततच्या मारहाणीमुळे त्रस्त होऊन माहेरी गेलेल्या विवाहितेचे सासरच्या मंडळींनी अपहरण केले. यानंतर या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मेहटियाना पोलिसांनी विवाहितेच्या पतीसहित 2 दीर व सासऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
असे आहे प्रकरण...
पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडिता म्हणाली की, तिचे लग्न 7 वर्षांपूर्वी हरमोये येथील रहिवासी तरुणाशी झाले होते. लग्नानंतर तिला सतत मारहाण सुरू होती. यामुळे त्रस्त होऊन ती आपल्या माहेरी गेली होती. तिची तब्येत ठीक नसल्याने ती आपल्या भावासोबत बाइकवर स्वार होऊन औषधे घेण्यासाठी जात होती. यादरम्यान ताजोवाल गावाजवळ तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांची बाइक अडवली. मारहाण करून किडनॅप करत सोबत नेले. घरी नेऊन तिच्या सासऱ्याने आपल्या मुलांसोबत तसेच आणखी एकासोबत मिळून सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपी तिला गाडीतून अनेक जागांवर फिरवत राहिले.
चंदिगडमध्ये पोलिसांना पाहून आरोपींनी काढला पळ...
पीडिता म्हणाली की, 27 डिसेंबर रोजी आरोपी तिला चंदिगडला घेऊन जात होते, तेव्हा चहा पिण्यासाठी त्यांनी वाटेत गाडी थांबवली. यादरम्यान समोर पोलिस उभे पाहून तिने आपली आपबीती सांगितली. यादरम्यान तिच्या सासरचे तेथून पळून गेले. यावर चंदिगड पोलिसांनी पंजाब पोलिसांना सूचना दिली.
माहेरच्यांनी हेल्पलाइन नंबरवर दिली होती किडनॅपिंगची माहिती...
पीडिता किडनॅप झाल्यावर तिच्या माहेरच्यांनी पोलिस हेल्पलाइन नंबर 181 वर या घटनेची माहिती दिली होती, यामुळे पोलिस विवाहितेचा शोध घेण्यासाठी छापेमारी करत होते. चंदिगड पोलिसांनी पीडितेबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यावर पीडितेला तेथून आणून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींचा शोध सुरू...
मेहटियाना पोलिसांनी पीडितेला सोबत आणून तिच्या जबाबाच्या आधारे पती, 2 दीर, सासरा व आणखी एकाविरुद्ध पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपात कलम 365, 376 आणि 120व्ही अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.