आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9वीच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेला लिहिले लव्ह लेटर, कृत्य समजताच बापानेही केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशियारपूर (पंजाब) - 9व्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला लव्ह लेटर लिहिले. प्रकरण तापल्यावर पोलिसांत गेले, तेव्हा आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांनी शाळेत मुलाची चूक कबूल करत प्रकरण शांत करण्यासाठी विनवणी केली. यासोबतच आपल्या मुलाचे अॅडमिशनही शाळेतून काढून घेतले. 

 

माफीनाम्यानंतर बापाने घेतला यूटर्न...
आता हे प्रकरण संपले, असे वाटत असतानाच पुन्हा गंभीर झाले. कारण आरोपी विद्यार्थ्याच्या बापाने शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिले की, दोन महिला शिक्षिका त्यांच्या मुलाचा द्वेष करतात. त्यांची बदली करून माझ्या मुलाला पुन्हा प्रवेश देण्याची मागणी केली. ही घटना एक आठवड्यापूर्वीची आहे. शिक्षण मंत्र्यांकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.


9वीच्या विद्यार्थ्याने लिहिलेल्या प्रेमप्रत्राची कहाणी, पीडित शिक्षिकेच्या जुबानी...
''मी दररोजप्रमाणे मुलांना शिकवत होते. पीरियड संपल्याची घंटा वाजली. मी टीचर्स रूममध्ये गेले. तेथे कोणीही नव्हते म्हणून मी खुर्चीवर बसले. 5 मिनिटे झाली असतील तेवढ्यात नवव्या इयत्तेत शिकणारा एक विद्यार्थी आला आणि माझ्या टेबलवर एक कागद ठेवून निघून गेला. मी कागद पाहिल्यावर धक्काच बसला. ते प्रेमपत्र होते. मी अतिशय संताप आला. ते प्रेमपत्र घेऊन मी प्रिन्सिपलची केबीन गाठली. त्यांनीही ते पत्र पाहिले. त्यांनी सर्वांना विचारले की, हे पत्र कुणी लिहिले आहे. रूममध्ये आलेला विद्यार्थी म्हणाला की, मी तर फक्त हे पत्र पोहोचवले आहे, मी लिहिले नाही. प्रिंसिपलनी पत्रावरील हस्ताक्षरावरून पत्र लिहिणाऱ्या आरोपीची ओळख पटवली.''


तक्रारपत्रात बापाने लिहिले- शाळेच्या 2 महिला शिक्षिका माझ्या मुलाचा द्वेष करतात....
शाळेच्या 2 शिक्षिकांनी माझ्या मुलाला विनाकारण काढून टाकले. दोन्ही शिक्षिका शाळेत बरोबर शिकवत नाहीत. दोघीही माझ्या मुलाचा द्वेष करतात. एवढेच नाही, त्यांनी शाळेच्या प्रिन्सिपलना पत्र लिहून मुलाला पुन्हा शाळेत प्रवेश देण्याची मागणी केली.

 

आधी म्हणाले होते- पोलिसांत जाऊ नका, मुलातर्फे मी माफी मागतो...
''हे खूप दु:खद आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी स्वत:ची चूक कबूल करत म्हटले होते की, मीच माझ्या मुलाचे नाव शाळेतून काढत आहे. त्यांनी हे प्रकरण पोलिसांत न जाऊ देण्याविषयी विनंती केली होती. शाळा सोडल्याचा दाखला मागितल्यावर आम्ही तोही दिला. पण आता ते शब्द फिरवत आहेत. पुन्हा पत्र लिहून त्यांनी प्रवेश देण्याची मागणी केली आहे.''

-अजमेर सिंह, प्रिन्सिपल

 

 

बातम्या आणखी आहेत...