आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तु मिळाली नाही तर मरुन जाईल... असे म्हणत केले लग्न, राणी बनवून ठेवण्याचे वचनही दिले, पण पावलोपावली करत होता महिलेचा विश्वासघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशियारपुर(पंजाब). प्रेम झाले... तु मिळाली नाही तर मरुन जाईल... असे म्हणून लग्न केले. पहिल्या पत्नीचे रहस्य उलगडले तर जीवे मारण्याची धमकी दिली... ही काय चित्रपटाची कथा नाही तर सत्य घटना आहे. पत्नी असूनही दूस-या महिलेला धोक्यात ठेवून तिच्यासोबत लग्न केल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा प्रमुख विजय पठानियाचा मोठा भाऊ कर्ण सिंहवर लावण्यात आला आहे. 


जहानखेलां येथे राहणारी पीडित महिला अमनदीप कौरनुसार 2005 मध्ये गावातील पटियाडियाच्या वीर कर्ण सिंहाने तिच्यासोबत चंदीगढच्या सेक्टर-35 येथील गुरुव्दारामध्ये लग्न केले होते. लग्न केल्यानंतर आरोपी म्हणाला की, माझ्या कुटूंबातील लोकांना लव्ह मॅरेज मान्य नाही यामुळे मी तुला घरी घेऊन जात नाही. यामुळे ही पीडिता अनेक वर्षे माहेरीच राहिली. यादरम्यान ती आरोपीला सासरी घेऊन जा असे अनेक वेळा म्हणाली, पण तो तिला टाळत राहिला. काही वर्षांनंतर या पीडितेला कळाले की, आरोपीने यापुर्वीही लग्न केले आहे आणि त्याला मुलंही आहेत. पीडितेने 20 ऑगस्ट 2018 ला एसएसपी कार्यालयात तक्रार केली. जवळपास 5 महिने तपास केल्यानंतर अखेर पोलिसांनी 21 डिसेंबरला वीर विरुध्द तक्रार दाखल केली. 

 

पीडिता म्हणाली : तो म्हणायचा राणी बनवून ठेवेले, मुलगी झाल्यानंतर येणेही बंद केले 
पीडिता अमनदीप कौरने सांगितले की, 2005 मधील ही घटना आहे, ती शहरातील बहादुरपुर चौकात बुटिक चालवायची. बीर नेहमीच बुटिकवर यायचा. तिथेच त्यांचे संबंध जुळले. वीर लग्नासाठी हट्ट करायचा आणि म्हणायचा की... जर तु मिळाली नाही तर मरुन जाईल... तुला राणी बनवून ठेवेले... मी त्याच्या गोष्टींमध्ये आले आणि लग्नासाठी तयार झाले. गुरुव्दारा साहिबमध्ये लग्न झाले. 2006 मध्ये मी मुलीला जन्म दिला आणि यानंतर त्याने माहेरच्या घरी येणेही बंद केले. 

 

सासरी जाण्याचा हट्ट केला तर घटस्फोटाचा अर्ज दिला 
मी वीरकडे सासरी जाण्याचा हट्ट केला तर त्याने 2008 मध्ये माझ्याविरोधात कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केला. पण दिड वर्षांनंतर वीरने तक्रार मागे घेतील. यादरम्यान तिने अजून एका मुलाला जन्म दिला. पण वीरचे वागणे जराही बदलले नाही. त्याने घरातील खर्च देणेही बंद केले. ती घरी शिवणकाम करुन मुलांचे संगोपन करत राहिली. 

 

2017 मध्ये मुलांची कस्टडी वडिलांना दिली 
अमनदीप कौरने सांगितले की, मुलांच्या भविष्यासाठी मी माझ्या सासू (वीरची आई) सोबत बोलले. त्यांनी मुलांच्या संगोपनावर लक्ष देण्यास सांगितले. डिसेंबर 2017 मध्ये आम्ही मध्यस्थता केंद्राव्दारे निर्णय घेतला की, दोन्ही मुलांची कस्टडी वीरला देण्यात यावी. या निर्णयानंतर दोन्ही मुलं वीरच्या घरी राहत होते. पण त्याची पहिली पत्नी आणि त्याचे मुलं माझ्या मुलांना सावत्र वागणुक देत होते. यामुळे मुलं नेहमीच माझ्याजवळ येऊन राहत होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...