आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्ख्या भावांच्या मृत्यूला कारणीभूत डॉक्टरचा दवाखाना विनापरवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- हदगावमधील एका बोगस डॉक्टरने दारूचे व्यसन सोडवण्यासाठी दिलेल्या औषधामुळे मृत्यू पावलेल्या दोघा भावंडांचे शुक्रवारी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन दोघांचेही मृतदेह नातेवाइकांना सोपवण्यात आले आहेत. पोलिसांनी बोगस डॉक्टर रवींद्र पोधाडे यास ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.  त्याच्याकडे दवाखाना चालवण्याचा कोणताही परवाना नसल्याचे आढळले अाहे.

 

दोन  भावंडांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला वैद्यक व्यावसायिक रवींद्र पोधाडे हा बोगस डॉक्टर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडे उपचार घेतलेल्या काही रुग्णांनी सांगितल्या प्रमाणे तो अॅलोपॅथीचेही उपचार करीत होता. तसेच गंडेदोरे देणे, जादू, भानामती, करणी, बाहेरची बाधा, तावीज आदी  देऊन रुग्णांची लूट करीत होता. याबाबत काही दिवसांपूर्वी गणेश पिंपळे नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. शिवाय  पोधाडे याची पत्नी व आईसुद्धा अनेक रोगांवर उपचार करतात, असे अनेक नागरिकांनी सांगितले.

 

इलेक्ट्रोपॅथीचा डॉक्टर

हदगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. जी. ढगे यांनी यापूर्वीच  रवींद्र पोधाडे यास ज्या पॅथीची पदवी आहे त्याच पद्धतीने उपचार करण्याची ताकीद दिली होती. पोधाडे  याच्याकडे  ईलेक्ट्रोपॅथीची पदवी असल्याचे तपासात आढळून आले.

 

हॉस्पिटलला परवाना नाही

पार्वती हॉस्पिटल नावाने पोधाडेकडून दवाखाना चालवला जात होता. मात्र या हॉस्पिटलला कोणताही परवाना नाही. आपल्या औषधाने दारूचे व्यसन सोडवण्यात येते असा दावा तो करत होता.  शिवाय संतती प्राप्तीसाठी उपचार, मूळव्याध, भगंदर, मूतखडा, संधिवात, किडनी विकार अशा अनेक  रोगांवर तो इलाज करीत असल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले.  

 

बातम्या आणखी आहेत...