आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच लाख थकल्याने हॉस्पिटलने नेऊ दिला नाही मृतदेह, वडील म्हणाले मुलगी 3 दिवसांपूर्वीच मरण पावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - 12 वर्षांची मुलगी जीबीएस म्हणजे गुलियन बेरी सिंड्रोमने (धोकादायक व्हायरसमुले नसा निष्क्रीय होऊन शरीराला पक्षाघात होणे) पीडित. ती जवळपास साडेचार महिने चोइथराम हॉस्पिटलमध्ये दाखल होती. अखेर तिचा मृत्यू झाला पण त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. मुलीच्या कुटुंबीयांच्या मंगळवारी प्रशासनाच्या जनसुनावणीत पोहोचत त्यांची मुलगी तीन दिवसांपूर्वीच मृत पावली होती, पण हॉस्पिटलने त्यांच्याबरोबर खोटे बोलल्याचे ते म्हणाले. 


मुलीचे वडील म्हणाले-तीन दिवसांपूर्वीच झाला होता मुलीचा मृत्यू 
हॉस्पिटल प्रसासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत. मुलीचे वडील मुकेश चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी मुलगी सुनीतावर गेल्या चार महिन्यांपासून चोइथराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता डॉक्टरांनी सांगितले की, तिची वाचण्याची शक्यता केवळ 5 टक्के आहे. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मुलीचा मृत्यू तीन दिवसांपूर्वीच झाला होता. आम्ही जेव्हा मुलीला घरी नेण्याबाबत बोललो तर आधी बाकी असलेले 2.4 लाखांचे बिल मागितले. 4 महिन्यात त्यांनी 19.5 लाखांचे बिल भरले आहे. 


व्हेंटिलेटर काढताच मृत्यू 
हे प्रकरण जिल्हा प्रशासनाकडे पोहोचल तेव्हा रुग्णालय प्रशासनाला मुलीला नेऊ देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर बिल माफ करून मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पण व्हेंटिलेटर हटवताच तिचा मृत्यू झाला. 


4.50 लाख माफ केले 
हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सुरेश कार्टन म्हणाले की, मुलीला 8 मे रोजी दाखल करण्यात आले होते. अनेक दिवस तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत 12.75 लाखांचे बिल झाले. त्यापैकी एक लाख मुख्यमंत्री सहायता योजना आणि 50 हजार पंतप्रधान मदत निधीतून मिळाले होते. त्याशिवाय 1.50 लाख आम्ही आधीच माफ केले होते. त्याशिवाय शिल्लक असलेले 3 लाखही माफ केले. मुलीला डिस्चार्ज देता येईल अशी तिची अवस्था नव्हती. त्यामुळे नातेवाईकांना तिला नेऊ देत नव्हतो. 


देशात प्रथमच जाहीर झाला रुग्णांच्या अधिकाराचा आराखडा 
4 सप्टेंबरलाच मानवाधिकार आयोगाने देशात प्रथमच रुग्णांना असलेल्या अधिकारांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार रुग्णाच्या मृत्यूनंतर आर्थिक वादावरून मृतदेह सोपवला नाही तर हा प्रकार गुन्ह्याच्या कक्षेत येऊ शकतो.  

बातम्या आणखी आहेत...