आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया - यजमान महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद; ८५ सुवर्णांसह २२८ पदके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : आगामी २०२४ अाणि २०२८ च्या अाॅलिम्पिक स्पर्धेत अापल्या खेळाडूंच्या सहभागाचा टक्का अाता वाढणार असल्याचा दावा यजमान महाराष्ट्राने मजबूत केला. महाराष्ट्र संघाने घरच्या मैदानावर अायाेजित खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये काैतुकास्पद कामगिरी करताना अापला दबदबा निर्माण केला. महाराष्ट्राने यंदाच्या स्पर्धेत २२८ पदकांसह स्पर्धेची चॅम्पियनशिप पटकावली. यासह महाराष्ट्राने गत वर्षीच्या तुलनेत यंदा पदकांच्या कमाईत दुपटीने प्रगती साधली. गतवर्षी ही संख्या ११० हाेती. अाता यात माेठी वाढ झाली. यामध्ये १७ वर्षाखालील युवा गटात पदक जिंकण्याचा अालेख वेगाने उंचावला अाहे. अाता या युवाच्या बळावर महाराष्ट्राला अाॅलिम्पिकची तयारी जाेमात करता येईल. 


बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत  देशभरातील २९ संघ सहभागी झाले हाेते. मात्र, अव्वल कामगिरीच्या बळावर यजमान महाराष्ट्राने चॅम्पियनशिप पटकावली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ११० पदकांसह द्वितीय स्थानावर राहिला होता. यंदाच्या स्पर्धेत बाजी मारत ‘खेळले राष्ट्र अाणि जिंकले महाराष्ट्र’ याच घाेषणेने अवघा परिसर दणाणून गेला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, क्रीडामंत्री विनाेद तावडे अाणि पालकमंत्री गिरीश बापट, क्रीडा विभागाचे सचिव राहुल भटनागर आणि साईच्या संचालक नीलम कपूर  या मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण विजेतेपदाची ट्राॅफी देऊन गाैरवण्यात अाले. स्पर्धेत ३६ राज्यांतील तब्बल ६५०० पेक्षा अधिक खेळाडू आणि हजारो पदाधिकारी, पंच सहभागी  झाले होते.   

 

यामुळे यंदा वाढली स्पर्धेत महाराष्ट्राची पदक संख्या

> १७ वर्षांखालील वयोगटाबरोबरच २१ वर्षांखालील वयोगटाचाही समावेश
> महाराष्ट्रातच स्पर्धा होत असल्याने संघाकडून ७५० खेळाडू सहभागी 
> स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सहभागी स्पर्धकांना देण्यात आले खास प्रशिक्षण
>  शासनाच्या क्रीडा धाेरण, योजनांमुळे शहर, ग्रामीणचे खेळांडू खेळाकडे

 

तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांना सुवर्ण
साक्षी शितोळे व ईशा पवारने तिरंदाजीमध्ये रविवारी सुवर्णपदक पटकावले. प्रथमेश जावकरचे केवळ एका गुणाने सुवर्ण हुकल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. साक्षीने २१ वर्षे मुलींच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण जिंकलेे. तिने फायनलमध्ये बंगालच्या सुपर्णावर  ६-० ने मात केली. मुलींच्या १७ वर्षे गटात ईशा पवारने १४५ गुणांसह कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकावले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...