आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्कः अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला 'होटल मुंबई' हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनुपम यांनी हॉटेल ताजचे हेड शेफ हेमंत ओबरॉय यांची भूमिका वठवली आहे. या चित्रपटात देशासोबत बेईमानी करुन दहशतवाद्यांना मदत करणा-या काही लोकांची रहस्ये उघड केली जाणार आहेत, जी सगळ्यांसाठीच धक्कादायक असेल. दैनिक भास्करला स्वतः हेमंत ओबरॉय यांनी चित्रपटात कशाप्रकारे ही रहस्ये उघड केली जाणार आहेत, त्याविषयी सांगितले.
चित्रपटात असेल बेईमान खासदाराचा प्लॉट : हेमंत
या चित्रपटात देशासोबत बेईमानी करणा-या खासदाराचा प्लॉट असेल. या खासदाराने दहशतवाद्यांना फोन करुन हॉटेलमध्ये किती लोक उपस्थित आहेत, याविषयीची माहिती पुरवली होती. आम्ही स्वतः त्यादिवशी दहशतवाद्यांच्या तोंडून हे ऐकले होते. त्या खासदाराने दहशतवाद्यांना हॉटेलमध्ये थांबलेल्या पाहुण्यांचे लोकेशन सांगितले होते. जर खासदाराने बेईमानी केली नसती तर कदाचित 16 लोकांचे प्राण वाचले असते. त्या खासदाराला सगळे ओळखतात, आज तो बिनधास्तपणे फिरतोय. या चित्रपटात त्या खासदाराचा पर्दाफाश केला जाणार आहे.
26/11 च्या रात्रीविषयी सांगायचे म्हणजे, नऊ वाजेच्या सुमारास मला माझ्या स्टाफने फोन करुन हॉटेलमध्ये शूटिंग होत असल्याचे सांगितले होते. शुटिंग तर कायम होत असल्याचे मी त्यांना म्हटले. तर त्यांनी शूटिंग म्हणजे गोळीबार होत असल्याचे मला सांगितले. हॉटेलच्या एका रेस्तराँमध्ये एका व्यक्तीला गोळी लागल्याचेही त्यांनी सांगितले. तेवढ्याच मी आणखी एका गन शॉटचा आवाज ऐकला. हॉटेलमध्ये तीन रेस्तराँ एकमेकांशी कनेक्टेड आहेत, मी तत्काळ इतर दोन रेस्तराँचे लाइट बंद करण्यास माझ्या स्टाफला सांगितले.
तोपर्यंत चार दहशतवादी पूल साइडवर पोहोचले होते, तेथे त्यांनी बेभान गोळीबार सुरु केला. आम्ही ताजच्या इंटर्नल सिक्युरिटीसोबत सतत संपर्क साधत होतो. त्यांना आम्ही दहशतवाद्यांच्या हालचालींविषयी सांगत होतो. पहिल्या मजल्यावर एका बँक्वेट हॉलमध्ये लग्नसमारंभ सुरु होता. आम्ही मेन गेट आणि साइट एंट्रेसला बंद करायला सुरुवात केली. तोवर दहशतवादी पूल साइड डॅमेज करुन सातव्या मजल्यावर पोहोचले होते. ते एक-एक रुम उघडून कुणी बचावले तर नाही हे बघत होते.
दरम्यान ते हॉटेलमध्ये ग्रेनेड्स फेकत होते. त्यांची प्रत्येक हालचाल सीसीटीव्ही कॅमे-यात कैद होत होती. पण त्यांनी सीसीटीव्ही कॅमे-याची ओपरेटिंग सिस्टम डॅमेज केली. आम्ही सगळ्यांनी मानवी साखळी करुन लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली. त्या रात्री आणखी लोकांचे प्राण वाचवले असते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.