आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानी इथे देणार आहेत लेकीची प्री-वेडिंग पार्टी, 50 एकरात पसरलेले 87 खोल्याचे आहे हे हॉटेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीचे लग्न 12 डिसेंबरला मुंबईत होत आहे. लग्नापूर्वीच प्री वेडिंग पार्टी उदयपूरमध्ये होणार आहे. त्यासाठी 8 ते 10 डिसेंबरसाठी हॉटेल ओबेरॉय उदयविलास बूक करण्यात आले आहे. 


जाणून घेऊयात कसे आहे हे हॉटेल 
- हॉटेल ओबेरॉय उदयविलास जवळपास 50 एकरात पसरलेले आहे. 2015 मध्ये जगातील सर्वा सुंदर हॉटेलच्या यादीत या हॉटेलचा समावेश करण्यात आला होता. 
- या हॉटेलचे आर्किटेक्चर राजस्थानी संस्कृतीची झलक दाखवणारे आहे. असे समजले जाते की, मेवाडचे महाराणा 200 वर्षांपूर्वी ज्याठिकाणी शिकार करायचे त्याठिकाणी हे हॉटेल तयार करण्यात आले आहे. 
- या हॉटेलचा 40 टक्के वनविभागाच्या अभयारण्यात येतो. 
- या हॉटेलमध्ये एकूण 87 खोल्या आहेत तर 1 कोहिनूर सुइट आणि 4 लक्झरी सुइट आहेत. 
- पिछोला तलावाच्या काठावर तयार करण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये तीन रेस्तरॉ, दोन पूल आणि लक्झरी स्पा आहेत. सर्व खोल्यांत वाय-फाय सुविधी आहे. 
- सुंदर वऱ्हांडे, कारंजे आणि गार्डन असलेले हॉटेल ओबेरॉय उदयविलास उदयपूर रेल्वे स्टेशनपासून 6 किमी अंतरावर आहे. उदयपूर एअरपोर्टवरून ड्राइव्ह करत या हॉटेलपर्यंत 45 मिनिटांत जाता येऊ शकते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...