आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला बळजबरीने ठाण्यात घेऊन जात होते पोलिस, ते पाहून पत्नीने पकडली पोलिस अधिकाऱ्याची कॉलर, म्हणाली- ज्यांच्याकडून पैसे खाता त्यांना पकडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर(झारखंड)- मारवाडी हॉटल परिसरात सुरू असलेली नेटवर्क मार्केटिंग कंपनी इनक्रेडेबल एडुकेयर लिमिटेडच्या ट्रेनिंग सेंटरवर बुधवारी साकची पोलिसांनी छापा मारला. पोलिसांना पाहून हॉटल संचालिका अनुराधा गोयनका भडकल्या. साकची ठाण्याचे अधिक्षक राजीव कुमार सिंह यांची कॉलक पकडून म्हणाल्या- ज्यांच्याकडून पैसे खाता त्यांना का पकडत नाहीत. जेव्हा पोलिस ट्रेनर्सना पकडून ठाण्यात घेऊन जात होती, तेव्हा संचालिकेसोबतच कर्मचारीदेखील आक्रमक झाले आणि त्यांनी मिळून पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या हाणामारीत इम्तियाज खान, बासुकी दुबे आणि रामदेव महतो हे तिघे जखमी झाले. या मारहाणीनंतर अतिरीक्त पोलिस दलाला पाचारण करण्यात आले.


10 दिवसांत दुसऱ्यांदा पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. 17 मार्चला एमजीएम हॉस्टपीलमध्ये उलीडीह ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि ए.एस.आय. यांना डॉक्टरांनी मारले होते. हॉटल संचालक रवि गोयनका, त्यांची पत्नी अनुराधा गोयनकासोबतच मार्केटिंग कंपनीच्या 12 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सिटी एस.पी. प्रभात कुमार साकची ठाण्यात पोहचले आणि प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी कंपनीचे मालक आणि इतर कर्मचाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

कंपनीचे एसोसिएट्स म्हणाले- कंपनी रजिस्टर्ड आहे, प्रोडक्टची विक्री करून लाखोंची कमाई केली जाते
मार्केटिंग कंपनी इनक्रेटेबल एडूकेयर लिमिटेडचे एसोसिएट्स अनिमेष कुमार महतोने सांगितले की, कंपनी रजिस्टर्ड आहे. कंपनीचे मुख्यालय पटनामध्ये आहे. ही एक मार्केटींग कंपनी आहे, ज्यात प्रोडक्टची करून लाखोंची कमाई केली जाते.


पोलिस म्हणाले- तक्रार मिळाली होती म्हणून छापा मारला
पोलिसांनी सांगितले नायडू टॉवरमधील मारवाडी हॉटलमध्ये नॉन बँकिंग कंपनी द्वारे मार्केटिंगच्या माध्यमातून तरूण-तरूणींना फसवण्याचे काम सुरू असल्याची तक्रार मिळाली होती. तक्रारीनुसार तपास करण्यासाठी गेलो असता, हॉटेल संचालिकेने आणि कर्मचाऱ्यांनी मारहाण सुरू केली.

 

काही वर्षांत कोट्याधिश होण्याबद्दल सांगत होते
मीटिंगमध्ये असलेल्या साकचीच्या रोहित रायने सांगितले की, मित्रांणी मार्केटींग कंपनीबद्दल सांगितले होते. मीटिंगमध्ये येण्यासाठी 50 रूपये घेतले होते. काही वर्षात कोट्याधिश होण्याची पद्धत मीटिंगमध्ये सांगत होते.


एका मुलीने माझ्याकडून 6 हजार रूपये घेतले
अभिनंदन होरेने सांगितले की, कंपनीत येण्यासाठी एका मुलीने त्याच्याकडून 6 हजार रूपये घेतले होते. कंपनीकडून लोकांना कोट्याधिश होण्याच्या पद्धती सांगितल्या जात होत्या. कंपनीत अनेक लोकांना चुकीची माहिती दिली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...