आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थर्टी फस्टला मुंबईत पब, बार आणि हॉटेल्स रात्रभर खुली; राज्य सरकारचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नववर्षाच्या स्वागताला मुंबई नगरी सज्ज असून थर्टी फस्टला मुंबईकर रात्रभर शहरात फिरणे पसंत करतात. त्यामुळे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नववर्षनिमित्त बाजारपेठा २४ तास सुरू ठेवण्याची मागणी केली होती.

 

राज्य सरकारने त्याला शनिवारी परवानगी दिली असून ३१ डिसेंबरच्या रात्री पब, बार आणि हॉटेल्स मुंबईत रात्रभर सुरु राहणार आहेत. नववर्षाच्या स्वागताला काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत तब्बल 40 हजार पोलिसांचा पहारा असणार राहणार असून तळीरामांवर खास नजर असणार आहे. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलीस साध्या वेषात वावरणार आहेत. यासोबत लाईव्ह कॅमेरानेही पोलीस मुंबईवर लक्ष ठेवणार असल्याचे डीसीपी व मुंबई पोलीस पीआरओ मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुणे, मुंबई, नवी मुंबई शहरांच्या अनिवासी भागातील, मिलच्या जमिनीवरील दुकाने, मॉल, हॉटेल ३१ डिसेंबरला रात्रभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. यामुळे राज्याच्या महसूलात वाढ होईल, शिवाय रोजगारही उपलब्ध होतील असे आदित्य यांनी पत्रात म्हटले होते.

 

आदित्य ठाकरे नाइट लाईफसाठी आग्रही आहेत. त्यांनी वारंवार त्याचा पाठपुरावाही केला आहे. नाइट लाइफच्या प्रस्तावाला शिवसेनेच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...