आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीओएस घेऊन तासन‌्तास बसावे लागते छतावर; नेटवर्क मिळाल्यावर मिळते रेशन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बऱ्हाणपूर - मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील झिरपांजरिया गावातील रेशन दुकानात गत वर्षभरापासून पाॅइंट ऑफ सेल (पीओएस) यंत्राच्या माध्यमातून गावकऱ्यांना रेशन वितरित केले जातेय. मात्र, या गावात नेटवर्क मिळत नाही. त्यासाठी दुकानदारास पीआेएस मशीन घेऊन तासन‌्तास दुकानाच्या छतावर बसावे लागते. नेटवर्क मिळाल्यानंतर मशीन लॉग-इन होते व त्यानंतर रेशन वितरित केले जाते. जिल्ह्यात १३० शासकीय स्वस्त धान्य दुकानांपैकी ४० पेक्षा जास्त दुकाने दुर्गम भागात असून, तेथे बीएसएनएल नेटवर्कची माेठी समस्या आहे. अशा भागात पीओएस यंत्रे आयडिया कंपनीचे पोस्टपेड सिम टाकून देण्यात आली आहेत. सुमारे ३८ गावांत ही डाेकेदुखी असल्याने संबंधित दुकानदारांना ऑफलाइन पद्धतीने रेशन वितरणाच्या सूचना दिल्या असून, नेटवर्कची समस्या लवकरच साेडवली जाईल, अशी माहिती पुरवठा अधिकारी अर्चना नागपुरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...