आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसाने घर कोसळले, १७ जणांचा मृत्यू; पुढील २४ तासांसाठी अलर्ट, पुद्दुचेरीत पुराचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई/कोइम्बतूर - तामिळनाडूतील कोइम्बतूरमधील नांदूर गावात मुसळधार पावसामुळे साेमवारी तीन घरे कोसळली. या घटनेत कमीत कमी १७ जण ठार झाले. मृतांमध्ये १० महिला आणि मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही दुर्घटना साेमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. त्या वेळी पीडित कुटुंब घरात झोपले होते. मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पूर्वेकडून येणाऱ्या हवेमुळे तामिळनाडूतील विविध भागात मुसळधार पाऊस झाला. पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेने मद्रास विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठाच्या सोमवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

इरोड आणि पुद्दुचेरीत पुराचा धोका, लोकांना सुरक्षित स्थळी नेले
 
पुद्दुचेरीतील संकरबनी नदीत पुराचा धोका निर्माण झाला आहे.यामुळे किनाऱ्यावरील लोकांना स्थलांतरित जाण्याचे सांगण्यात आले आहे. विदुर धरणातून पाणी सोडल्यास स्थिती बिघडेल. इरोडमध्ये भवानी नदीत पाण्याची पातळी वाढत असल्याने पुराचा इशारा देण्यात आला आहे.

चेन्नई, तुतिकोरिनमध्ये शाळा, महाविद्यालये बंद :


सळधार पावसामुळे चेन्नई, तुतिकोरिन, कांचीपुरम आणि तिरुवलूरमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. सर्वाधिक परिणाम तुतिकोरिन, कुडलूर, तिरुनेलवेली जिल्ह्यात पडला आहे. १५०० पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे.२०१५ मध्ये ३०० लोक ठार झाले होते


२०१५ मध्ये पुरामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उत्तर-पूर्व मान्सूनच्या पुरामुळे तामिळनाडू, आंध्र आणि पुद्दुचेरी उद्ध्वस्त झाले होते. ३०० लोक मारले गेले होते. १८ लाख प्रभावित झाले होते व २० हजार कोटींचे नुकसान झाले होते.थंडीच्या तावडीत उत्तर भारत, मैदानात थंड हवा


जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचलसारख्या राज्यांमध्ये हिमवर्षावामुळे पूर्ण उत्तर भारत थंडीने गारठला आहे. हिमवर्षावामुळे थंडीने पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसारख्या मैदानी भागालाही तावडीत घेतले आहे.