आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयाेध्यानगरातील बंद घर फाेडले, 29 हजारांचा एेवज लंपास; अाराेपीला केली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अयोध्यानगरात टाइल्स फिटिंग व्यावसायिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २६ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. ११ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. शनिवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सीताराम कन्हय्यालाल सैनी हे अयोध्यानगरात पत्नी मीना व मुलगा तेजपालसह राहतात. ११ ऑगस्ट रोजी त्यांच्याकडे कामाला असलेल्या मजुरांची मजुरी देण्यासाठी ते सकाळीच परिसरातील अयोध्या प्रोव्हिजनजवळ गेले होते. तर त्यांच्या पत्नी मीना ह्या मुलास घेऊन दवाखान्यात गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी केली. सैनी हे दुपारी १२ वाजता घरी परतल्यानंतर त्यांना कुलूप तोडलेले दिसून आले. कपाटाची तिजोरी फोडून त्यातील १८ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, २ हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या साखळी, १ हजार रुपये किमतीचे चांदीचे जोडवे तसेच ५ हजार रुपयांची रोकड असा एकूण २६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. शनिवारी सैनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अाराेपी अजय राठाेड याला एमअायडीसी पाेलिसांनी अटक केली अाहे.

बातम्या आणखी आहेत...