आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्यामनगरात रेकी करून सव्वा लाखाची घरफोडी, घटना सीसीटीव्हीत कैद...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गिरणा पंपिंग रस्त्यावरील श्यामनगरात एका बंद घरातील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी हातसफाई करत नवविवाहित दांपत्याचे एक लाख रुपयांचे दागिने व २५ हजार रुपये रोख असा ऐवज चोरून पोबारा केला आहे. ही घटना रविवारी पहाटे २.०७ वाजता घडली. दरम्यान, समोरच्या घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाच चोरटे कैद झाले आहेत. या चोरट्यांनी दिवसा रेकी करून रात्री चोरी केल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला. 


श्यामनगरातील संदीप रवींद्र ठाकूर यांच्या घरात ही चोरी झाली आहे. ठाकूर यांचे २९ डिसेंबर रोजी लग्न झाले असून, श्यामनगरात ते पत्नी व लहान भाऊ शुभम यांच्यासोबत राहतात. वैद्यकीय प्रतिनिधी असलेले संदीप हे लग्नानंतर पत्नीसह मनाली येथे फिरण्यासाठी गेले होते.

 

परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण 
शनिवारी दिवसभरात काही परप्रांतीय तरुण विविध वस्तू विकण्याच्या निमित्ताने श्यामनगर भागात आले होते. या तरुणांनी दिवसभराचा काही तास याच भागात घालवला होता. याच तरुणांनी रेकी करून रात्री चोरी केल्याचा संशय श्यामनगरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 
 

 

बातम्या आणखी आहेत...