आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी पतीला आवडीची अंगठी मिळावी यासाठी तरुणीने विकले घर, सोशल मीडियावर फोटो टाकताच लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अमेरिकेत राहणाऱ्या एका तरुणीने साखरपुड्याची आवडीची अंगठी मिळावी म्हणून चक्क तिच्या नियाेजित पतीचे घरच विकून टाकले. ही साेन्याची किंवा डायमंडची सामान्य अंगठी नाही, तर वराच्या मागणीवरून खास बनवून घेतलेली पर्पल डायमंडची व फुलाच्या आकाराची आहे. ही अंगठी तिच्या भावी पतीला आवडली खरी; परंतु तिचे छायाचित्र साेशल मीडियावर टाकताच संबंधित तरुणीस माेठ्या प्रमाणावर ट्राेल केले जात आहे.   


संबंधित तरुणीचे नाव समाेर येऊ शकलेले नाही; परंतु या अंगठीमुळे लाेक आपले काैतुक करतील, अशी तिला अपेक्षा हाेती. मात्र, झाले उलटेच. तिने माेठ्या अपेक्षेने अंगठीचा फाेटाे साेशल मीडियावर टाकून त्याखाली ‘ही साधी अंगठी नव्हे, तर खास बनवून घेतलेली आहे, असेही लिहिले हाेते. मात्र, युजर्सनी अंगठीसाठी घर विकणे याेग्य नसल्याचेही सांगितले.

 

गुडलक, कारण भविष्यात तुला याची खूप गरज भासेल 

सोशल मीडियावर अनेक युजर्सना  साखरपुड्याची ही अंगठी पाहून एका अंगठीसाठी कुणी घर विकू शकणार नाही, असे वाटत हाेते. कारण असे करणे मूर्खपणाचे आहे, असे त्यांचे मत हाेते. काही युजर्सना ती अंगठी म्हणजे एखाद्या परीसारख्या ड्रेसचा एक भाग वाटला, तर एका अंगठीसाठी तू घराची विक्री का केली? निवाऱ्यापेक्षा अंगठी गरजेची आहे काय? असे प्रश्न दुसऱ्या एका युजर्सने विचारले आहेत. तसेच अंगठी घालून तुला तुझे घर परत मिळेय काय? हा खूपच मूर्खपणाचा निर्णय आहे. याचा विचार करूनच भीती वाटते. एखाद्या अनावश्यक बाबीसाठी कुणी घरदेखील विकू शकते, हे पाहून धक्काच बसला. तुला या अंगठीत असे काय दिसले? भलेही ती अंगठी फुलाच्या आकाराची असेल; परंतु ती तर केकच्या आकाराची दिसतेय, असे एका युजरने म्हटले आहे. हा केवळ विनाेद तर नाही ना? एक तर तुला सर्व काही सहज मिळत असावे किंवा तुझ्या जीवनात काहीही अडचणी नसतील. म्हणून तू असा विचित्र निर्णय घेतला असावा; परंतु असे करणे माझ्या मते पूर्णपणे चुकीचे आहे. अंगठी व राहत्या घराची तुलना हाेऊ शकत नाही. असे आणखी एका युजरने म्हटलेय.