आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब गाढ झोपेत असताना मातीची भिंत कोसळली, आजी व एका नातीचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी- मातीच्या घराची भिंत पडल्याने ढिगाऱ्याखाली दबून आजीसह नातीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री परतूर तालुक्यातील पिंपळी धामणगाव येथे घडली. प्रभावती अण्णा मठपती (५५), आदिती नागेश स्वामी (२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. 


धामणगाव येथील रहिवासी असलेले अण्णा रामलिंग मठपती यांचे गावाच्या मध्यभागी घर आहे. या घराच्या भिंती मातीच्या असल्यामुळे चारही बाजूंनी या भिंतीला भेगा पडलेल्या आहेत. मठपती कुटुंबास मुलगा नसून तीन मुली आहेत. दरम्यान, दोन मुली माहेरी आल्या होत्या. एक नात ही आजीसोबत झोपली होती. दरम्यान, सोमवारी रात्री जेवण करून सर्व जण झोपले होते. मध्यरात्री अचानक भिंत कोसळली. यात प्रभावती मठपती, नात आदिती स्वामी या दोन्ही जागीच ठार झाल्या.

घरात झोपलेले अण्णा मठपती, पूजा नागेश स्वामी, मुलगी रेखा नागेश कामठे, शिवप्रसाद नागेश कामठे, सुमनबाई गंगाधर पांगारकर हे जखमी झाले. भिंत पडल्याचा आवाज येताच ग्रामस्थांनी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मंडळ अधिकारी एम. ए. चाऊस, तलाठी कृष्णा इंगोले यांनी पंचनामा केला आहे. 


दगड बाजूला करून केली ग्रामस्थांनी जखमींना मदत 
मध्यरात्री सर्वच कुटुंब गाढ झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली. मातीची जुनी दोन फूट रुंद, पंधरा फूट लांब भिंत अचानक कोसळली. पत्रे व वजनासाठी ठेवलेले दगड त्यांच्या अंगावर पडले. यामुळे मातीसह दगडाखाली दबल्याने दोघींचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...