आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह स्टोरी / रामलीलाच्या किसींग सीनमुळे वाढली होती दीपिका-रणवीरची जवळीक, 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर थाटले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. 14 नोव्हेंबर रोजी कोकणी पद्धतीने इटलीतील लेक कोमोत दोघे विवाहबद्ध झाले. लग्नापूर्वी सहा वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. 2012 मध्ये आलेल्या गोलियों की रासलीला-रामलीला  हा त्यांचा एकत्र केलेला पहिला चित्रपट होता. Huffington Post सोबतच्या बातचितमध्ये चित्रपटाच्या एका क्रू मेंबरने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सेटवर दोघांच्या केमिस्ट्रीचा आँखो देखा हाल सांगितला आहे.

 

किसमुळे जवळ आले दोघे

क्रू मेंबरने सांगितल्यानुसार, 2012 मध्ये संजय लीला भन्सालींच्या गोलियों की रासलीला-रामलीलाच्या सेटवर अंग लगा दे हे गाणे चित्रीत केले जात होते. गाण्याच्या शेवटी दोघांवर एक किसींग सीन चित्रीत केला जाणार होता. त्यावेळी दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही दोघे एकमेकांना किस करत राहिले होते. त्या रात्री सेटवर 50 लोक उपस्थित होते. सगळे हा नजारा बघून हैराण झाले होते. या किसींग सीननंतरच दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले होते.

 

व्हॅनिटी व्हॅनमध्ये घालवायचे बराच वेळ एकत्र
सेटवर हे दोघे एकमेकांना बेबी म्हणून संबोधत होते. एकत्र जेवण करणे, शूटिंग नसताना व्हॅनिटी व्हॅनमध्ये तासन्तास दोघे एकत्र घालवत असे. शूटिंगनंतर दोघांचे नाते पुढे जाणार नाही, असे त्यावेळी अनेकांना वाटले होते. पण असे घडले नाही. ही जोडी बाजीराव मस्तानीमध्ये पुन्हा एकत्र आली आणि हे दोघे एकत्र असल्याचे त्यावेळी पुन्हा समोर आले.

 

आणखी एका सूत्राने सांगितल्यानंतर, ग्रुप डिनरमध्येही या दोघांच्या नजरा एकमेकांवरच खिळल्या असायच्या. विवाहित दाम्पत्याप्रमाणे दोघे वागत असे.  बाजीराव मस्तानीच्या शूटिंगच्या काळात रणवीर त्याचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतरही दीपिकासाठी तिथे थांबत असे. स्वतःपेक्षा तो दीपिकाच्या करिअरला जास्त प्राधान्य देत असल्याचे लोक सांगतात. रणवीरनेच दीपिकाला हॉलिवूडमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता.  

बातम्या आणखी आहेत...