Home | Business | Auto | How Anti-lock braking system works in a bike

बाइकमध्ये अशी काम करते अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम

दिव्य मराठी नेटवर्क, | Update - Jul 13, 2019, 09:52 AM IST

१ एप्रिल २०१९ पासून १२५५ सीसीपेक्षा मोठ्या इंजिनच्या बाइक्समध्ये एबीएस (अँटी-लाॅक ब्रेकिंग सिस्टिम) अनिवार्य

 • How Anti-lock braking system works in a bike

  १ एप्रिल २०१९ पासून १२५५ सीसीपेक्षा मोठ्या इंजिनच्या बाइक्समध्ये एबीएस (अँटी-लाॅक ब्रेकिंग सिस्टिम) अनिवार्य केली आहे. आपल्या देशात अनेक लोक प्रथमच या सिस्टिमचा वापर करत आहेत कारण आता जवळपास प्रत्येक लहान बाइकमध्ये ती दिली जातेय.गेल्या दोन महिन्यांपासून एबीसीमुळे सर्व्हिस सेंटरवर लोक जास्त येत आहेत, कारण त्यांना एबीएस कसे काम करते हे माहीतच नाही. लोक ब्रेक लावतात आणि त्यांना वेगळाच अनुभव येतो (जो त्यांनी आधी आला नाही.) त्याची तक्रार घेऊन सर्व्हिस स्टेशनला जात आहेत. या गोष्टी माहीत असल्या तर तुम्हाला सर्व्हिस स्टेशनला जाण्याची गरज राहणार नाही...


  रोखत नाही, वेग कमी करतो
  चालक बहुतांश वेळा घाबरून बाइकचा पुढील ब्रेक लावतात, याउलट बाइकचा वेग पुढील टायरद्वारे परिणामकारकरीत्या कमी होतो. जास्त दबावामुळे पुढील टायर लॉक होईल आणि बाइक क्रॅश होईल हे भीतीचे कारण असते. एबीसी हेच क्रॅश रोखते. ते ब्रेक प्रेशर नियंत्रित करते आणि बाइकचे टायर लॉक होऊ देत नाही. एबीएस पुढील टायर एकदम थांबवत नाही, वेग जवळपास थांबण्याच्या स्थितीत आणून ठेवते.


  वेगळे का वाटते?
  जेव्हा तुम्ही एबीएसची बाइक चालवता तेव्हा ब्रेक लावल्यावर व्हायब्रेशन, डगमगणे, कंपन असे काहीसे जाणवते, हे खूप सामान्य आहे. एबीएस अप्लाय केल्यावर ब्रेक लिव्हरवर होणारी कंपने नॉर्मल आहेत, त्याचसोबत काही आवाजही ब्रेकमधून येत असल्याचे जाणवू शकते. जेव्हा तुम्ही प्रथमच त्याचा उपयोग करता तेव्हा आश्चर्यचकित होता, पण त्यामुळे घाबरून ब्रेक लिव्हर सोडू नये. काही काळ गेल्यावर त्याची सवय होईल आणि ब्रेक जास्त विश्वासाने लावाल. हे ब्रेक्स अप्लाय करण्यासोबतच बाइकची दिशा बदलण्याची सवयही धोक्यांपासून दूर करण्यात मदतीची ठरू शकते.


  हेही माहीत करून घ्यावे
  > एबीएसचा परिणाम रस्त्याच्या स्थितीवरही अवलंबून आहे. चांगल्या रस्त्यावर ते जास्त परिणामकारक आहेत, तर कच्च्या रस्त्यावर ते अनिश्चित होतात.
  > स्पीडब्रेकर्स आणि खड्ड्यांवर थोडेसे लिव्हर दाबले तरी ते अॅक्टिव्ह होतात कारण पुढील टायरमध्ये हवा असते आणि ते सिस्टिमला कन्फ्यूज करते.
  > त्यावर जास्त विश्वास ठेवू नका आणि वेग मर्यादितच ठेवा, कारण त्यांचीही एक मर्यादा असते.

Trending