आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना “शहा’ बनवणारे भाजप अध्यक्ष अमित शहा भाजपचे सर्वात मोठे रणनीतिकार कसे झाले ते वाचा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात प्रवेश १९८८  मध्ये केला
भाजप   अध्यक्ष  अमित शहा मोदींच्या विजयाचे प्रमुख रणनीतिकार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जिथे त्यांनी उत्तर प्रदेशात भाजप व अपना दलासोबतच्या आघाडीस ८० पैकी ७३ जागा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसरीकडे, २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी देशभरात भाजपच्या जागा वाटप, उमेदवार निवड आणि प्रचारापर्यंतची सर्व जबाबदारी पार पाडली. शहा मोदींनंतर भाजपचा दुसरा सर्वात मोठा चेहरा म्हणून समोर आले आहेत. १९८८ मध्ये राजकारणात प्रवेश केल्यानंतर शहा खूप वेगाने केवळ ३० वर्षांतच आपले यश व कौशल्यामुळे गुजरात व नंतर राष्ट्रीय राजकारणात सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक झाले. मोठ्या नेत्यांची तिकिटे कापणे, पक्ष व नेत्यांबाबत कठोर निर्णय घेतल्यामुळे शहा यांची कडवट नेत्याची प्रतिमा तयार झाली.

 

अध्यक्ष झाल्यानंतर शहा यांनी सर्वप्रथम उद्दिष्ट ठेवले- भाजपची सदस्य संख्या १० कोटी करणे. त्यांच्या उद्दिष्टाची विरोधकांनी खिल्ली उडवली. मात्र, मिस्ड कॉलच्या माध्यमातून या मोहिमेस नव्या तंत्रज्ञानाला जोडून शहांनी भाजपला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनवले. आतापर्यंत राज्ययसभा सदस्य राहिलेले शहा गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. २०२६ मध्ये पंतप्रधान मोदी पंचाहत्तरी ओलांडतील. आपल्या धोरणामुळे शहा प्रसारमाध्यमे आणि पक्षात चाणक्य नावाने प्रसिद्ध आहेत. अमित शहा आता आपल्या क्षमतेच्या जोरावर २०२६ मध्ये नैसर्गिकरीत्या मोदींचे उत्तराधिकारी म्हणून समोर येऊ शकतात.

 

1988 ते 2013 : १७ व्या वर्षी मोदी यांची पहिल्यांदा भेट, आता ३३ वर्षांची सोबत

अमित शहा यांचा २२ ऑक्टोबर १९६४ मध्ये मुंबईत जन्म झाला. त्यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी नाही. वडील पीव्हीसी पाइप्सचा व्यापार करत होते. अमित शहा केवळ १४ वर्षांचे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. तेव्हा जेव्हा नरेंद्र मोदींना प्रथम भेटले तेव्हा त्यांचे वय १७ वर्षे होते. शहा यांच्यावर मोदींची तेव्हाच छाप पडली. २२ व्या वर्षी अमित शहा भाजपत दाखल झाले. ३५ व्या वर्षी मंत्री झाले आणि ५० व्या वर्षी ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले. ते आतापर्यंतचे भाजपचे सर्वात युवा अध्यक्ष आहेत. अमित शहा यांनी पहिली निवडणूक १९८८ मध्ये प्राथमिक सहकारी संस्थेसाठी लढवली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यंानी लहान-मोठ्या २९ निवडणुका जिंकल्या असून एकही हरले नाहीत. सन २००२ मध्ये गुजरातच्या मंत्रिमंडळातील ते सर्वात तरुण मंत्री झाले. विविध पदांवर राहत त्यांनी गुजरात फायनान्स कॉर्पाेरेशन व गुजरात रोड ट्रान्सपोर्टला तोट्यातून बाहेर काढले. गुजरातमधील व्यवस्थापन कौशल्य पाहून २०१४ मध्ये भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शहा यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली.

 

2014: तंत्रज्ञानावर भर, युवांना जोडले, जिथे अन्य पक्ष गेला नाही तिथे मोदी रथ पोहोचवला

गेल्या लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांनी जास्त सभा घेतल्या नव्हत्या. २०१४ च्या निवडणुकीत भाजपसाठी वॉर रूम भलेही प्रशांत किशोर यांची संस्था सिटिझन्स फॉर अकांटेबल गव्हर्नन्सने सांभाळले, मात्र भाजपच्या नियंत्रण कक्षात अमित शहा यांचीच महत्त्वाची भूमिका राहिली. अमित शहा तास न् तास डझनभर युवा कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत धोरण आखत होते.

 

जागांच्या तीन श्रेण्या : अमित शहा यांनी मतदारसंघ तीन श्रेणीत विभागले. प्रथम अशा जागा ज्या भाजपच्या गड होत्या. म्हणजे जास्त कष्ट घेण्याची गरज नव्हती. दुसरे, अशा जागा जिथे कितीही कष्ट घेतले तरी जिंकणे अशक्य होते. तिसरे, अशा जागा जिथे निवडणूक कुणीकडेही फिरू शकते. अशा पद्धतीने शहांनी कोणत्या जागेसाठी किती वेळ, कष्ट घ्यायचे ते ठरवले.


प्रत्येक घटकापर्यंत काम: लोकसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी गावो-गावी प्रचारक तयार केले. उल्लेख एन.पीं.चे पुस्तक “वॉर रूम’नुसार अमित शहांना यूपीतील प्रत्येक लोकसभा जागेतील कमीत कमी १००  स्थानिक नेत्यांची नावे लक्षात ठेवत असत.


मोबाइल मोदी रथ: यूपीत गावागावात मोबाइल यूपी रथ चालवण्याची कल्पना अमित शहा यांची होती. शहा यांनी गावातील सॅटेलाइट टीव्हीची कमतरता पाहता व्हॅनच्या माध्यमातून उमेदवारांचे संदेश  पोहोचवण्याचा निर्णय घेतला. ही दूर्गम गावे होती, जिथे अन्य पक्ष पोहोचणे योग्य समजत नव्हते. 


तंत्रज्ञानावर भर: शहा यांनी लखनऊमध्ये आधुनिक वॉर रूम केली. आयटी सेल स्थापन केला. कॉल सेंटर बनवले. याद्वारे भाजपच्या कार्यक्रमांची माहिती दिली.

 

2019: भाजप सत्ताधारी पक्ष असल्याची जाणीव होऊ दिली नाही, कार्यकर्त्यांना सतत प्रशिक्षण 
2014 च्या तुलनेत अमित शहा यांनी या वेळी जास्त सभा घेतल्या. स्वत: शहा यांनी सांगितले की, त्यांनी १६१ सभा घेण्यासाठी दीड लाख किमीचा प्रवास केला. या वेळी शहांनी देशभरातील मतदारसंघांसाठी रणनीती आखली. मोदींचे सर्वात विश्वासू असले तरी शहा यंाच्यावरील जबाबदारी तेवढी सोपी राहिली नाही. उलट, वाढली आहे. २०१९ त्यांच्यासाठी आव्हानात्मक होते. नुकतेच तीन राज्यांतील सत्ता गमावली,अशी ही वेळ होती. शहा यांनी २०१९ च्या योजनांवर गुजरात विधानसभा निवडणुकीआधीच काम करण्यास सुरुवात केली होती.
 

 

पुलवामानंतर रणनीती बदलली:

शहा यांनी २०१९ साठी मोदींचा विकासाचा अजेंडा पुढे नेण्याचे धोरण आखले होते. मात्र, १४ फेब्रुवारीच्या पुलवामा कांडानंतर त्यांना धक्का बसला. शहा तीन दिवस कोणालाच भेटले नाहीत. धोरण ठरवण्यात संभ्रम होता. बालाकोटनंतर २६ फेब्रुवारीला शहा पुन्हा जुन्या रूपात परतले.
केवळ मोदी केंद्रित प्रचार: शहा यांनी संपूर्ण मोहीम गावांत पोहोचवली. विरोधी पक्षांचा प्रचार शहरी- निम शहरी भागांपुरता मर्यादीत होता. सोबत त्यांनी निर्देश दिले होते की, मोहिमेतील पोस्टर- होर्डिंग्जमध्ये त्यांचे(शहा) यांचे छायाचित्र नसेल.


दररोज 524 किमी प्रवास:

शहांनी २.४७ कोटी सदस्यांच्या पक्षास ११ कोटीपर्यंत पोहोचवले. प्रथमच ११ लाख सक्रिय कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले. शहांचा राजकीय प्रवास सरासरी ५२४ किमी प्रतिदिन आहे.


भाजप कार्यालये वाढवली: शहा यांनी देशातील प्रत्येक जिल्ह्यात आपल्या मालकीच्या जमिनीवर कार्यालय थाटण्याचे धोरण आखले. सध्या ७८% जागांवर पक्षाचे स्वत:चे कार्यालय आहे.


प्रचाराचे तीन पाॅइंट ठरवले: सर्वात प्रथम उमेदवारांची प्रासंगिता संपवून स्थानिक स्तरावर सत्ताविरोधी लाट कमकुवत करणे. दुसरे- मतदारांच्या मेंदूवर प्रभाव टाकण्यासाठी प्रचाराच्या टायमिंगची रणनीती, म्हणजे मतदारांना जास्त विचार करायला लागू नये. तिसरे- प्रचारातील मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवाद करणे. मोदींनी या रणनीतीनुसार, निवडणूक सभेत उमेदवाराचे नाव न घेता कमळाचे बटन दाबण्याचे आवाहन केले.
 

 

कार्यशैली : तळागाळात काम करण्याची आवड
अमित शहा यांची प्रतिमा एक कठोर नेत्याची आहे, दुसरीकडे त्यांना तळागाळातील नेता मानले जाते. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य व कार्यशैलीची काही उदाहरणे-


> जोखीम घेतात : 2014 च्या लोकसभा निवडणुकींत यश मिळवणे व अध्यक्ष झाल्यानंतर काही महिन्यात त्यांनी शिवसेनेशी २५ वर्षांपासून सुरू असलेली युती तोडण्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयावर मोदीही चकित झाले.मात्र, भाजपवरील शिवसेनेचा दबाव कमी करण्यासाठी त्यांनी ते योग्य समजले होते.
 

> स्थानिक नेत्यांची काळजी : उल्लेख एन.पी. यांचे पुस्तक ‘वॉर’ नुसार, ते सतत स्थानिक नेत्यांशी चर्चा करतात आणि सुरुवात “मित्र बोलतोय’ अशी करतात.


> कार्यकर्त्यांशी बंध : अमित शहा प्रवासादरम्यान खूप कमी वेळा हॉटेलमध्ये थांबतात. ते एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी किंवा सर्किट हाऊसमध्ये थांबणे पसंत करतात. यामुळे कार्यकर्त्यांशी जवळीक होते, असे ते मानतात.


> खर्चावर लगाम : शहा लहान-मोठ्या खर्चावरही लक्ष ठेवतात. “वॉर रूम’ पुस्तकात एक किस्सा आहे. २०१४ मध्ये पक्षाची बुकलेट छापली जात होती, तेव्हा शहांचा एका सहकारी प्रति प्रिंट अडीच रुपये घेत होता. त्यांचा एक सहकारी सुनील बन्सलने दीड रुपये प्रति प्रिंट दराने बुकलेट छापले. ते निवडणूक प्रचार वगळता चार्टर्ड विमानाचा वापर करत नाही.


> पक्षाचा कायापलट : अमित शहा यांनी पक्षाच्या काम करण्याच्या पद्धतीत बराच बदल केला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे पक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रणाली तयार केली. यामुळे दिल्लीत कमीत कमी कार्यकर्ते यावेत असा उद्देश होता. २०१४ पासून शहा यांनी थेट खात्यात पैसे पाठवण्याची सुरुवात केली.


> 24 तास, 365 दिवस काम : शहा यांच्या म्हणण्यानुसार, संघटना नेहमी २४ तास ३६५ दिवस कार्यशील राहायला हवी. त्यांनी १९८२-८३ पासून वॉर्डाचे प्रभारी म्हणून कामास सुरुवात केली.