आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस वाहन विम्याचे वाढत आहे जाळे, तुम्हीही होऊ शकता शिकार; पॉलिसी घेताना या गोष्टींची काळजी घ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - मोटर इन्शुरंस पॉलिसी रिन्यू केल्यानंतर प्रीमियम आणि अॅड ऑन करण्यावर कोणी तुम्हाला मोठी सुट देत असतील तर एकदा त्या कंपनीच्या एजंडविषीयी पूर्ण माहिती काढून घ्या. बऱ्याच दिवसांपासून देशभरात बोगस वाहन विम्याचे प्रकरणे वाढत आहेत. यामुळे सरकारपुढे आता बोगस विमा वाल्यांचे आव्हान आहे. 


2019 मध्ये 1200 बोगस वाहन विम्याचे प्रकरणे समोर आल्याचे खुद्द अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी संसदेत सांगतिले. विमा नियामक आयआरडीआयच्या मते, गेल्या दोन वर्षांत 53.7 कोटी रुपयांच्या बोगस वाहन विम्याची विक्री झाली आहे. ट्रक आणि दुचाकी वाहनधारकांना बोगस पॉलिसीची विक्री करण्यात आली आहे. या बनावटीपासून बचाव करण्यासाठी विमा कंपन्या आता नवीन मार्ग शोधत आहेत. 

या बोगसपणापासून वाचण्यासाठी विमा कंपन्या आता पॉलिसीवर फिक्स बार कोड आणि होलोग्राम उपलब्ध करून देत आहे. एसबीआय जनरल इन्शुरंसचे सीओओ अतुल देशपांडे म्हटले की, नेहमी मान्यताप्राप्त आणि सत्यापित इन्शुरंस एजंटकडून पॉलिसी खरेदी करा. तुम्ही एजंटकडे याबाबत पुरावा देखील मागू शकतात. पॉलिसीचे पेमेंट चेक किंवा अशा माध्यामातून द्या जेथे पैसे हस्तांतरीत होतील. 


एका डेटानुसार, देशात 50 टक्के दुचाकी वाहने विना इन्शुरंस धावत आहेत. यामुळे नवीन गाड्यांसाठी लॉन्ग टर्म थर्ड पार्टी इन्शुरंस सक्तीचे केले आहे. बोगस पॉलिसी विशेषतः जुने वाहने खरेदी करण्यासाठी वापरण्यात आली आहेत. एजंट आरटीओच्या डेटाबेसच्या आधार लोकंना आपल्या जाळ्यात ओढतात. फेक पॉलिसी जारी करण्यासाठी खोटे लेटर हेड आणि स्टँपचा वापर करत असल्याचे आयआरडीआयच्या तपासात दिसून आले. दरम्यान कंपनी या बोगस पॉलिसीबाबत लोकांमध्ये जागरुकता करत आहे. थोडेसे पैसे वाचवण्यासाठी बोगस पॉलिसीला बळी पडू नका असे त्यांचे म्हणणे. 

बातम्या आणखी आहेत...